मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट उघडकीस, अडीच कोटी रुपयांत सुपारी दिली; बीडमधून दोन जणांना अटक

मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट उघडकीस, अडीच कोटी रुपयांत सुपारी दिली; बीडमधून दोन जणांना अटक

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जरांगे यांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असल्याची तक्रार आल्यानंतर जालना पोलिसांनी तातडीने कारवाई करून बीड जिल्हय़ातून दादा गरूड आणि अमोल खुणे या दोन जणांना अटक केली. यापैकी अमोल हा जरांगे यांचा पूर्वीचा सहकारी असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी बीड येथे गुप्त बैठक झाल्याची माहिती जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना मिळाली. अडीच कोटी रुपयात सुपारी वाजवण्याचे ठरल्याची पक्की माहिती मिळताच काळकुटे यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली. तक्रार मिळताच जालना पोलिसांनी तातडीने कारवाई करून बीड येथून दादा गरुड आणि अमोल खुणे या दोघांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत या दोघांनी एका मोठय़ा राजकीय नेत्याचे नाव घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी स्वतŠ रात्री उशिरा  पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली.  

मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ

मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली असून जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जरांगे यांना अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिंदुस्थानी वंशाच्या तरुणांनी झुकरबर्ग यांचा विक्रम मोडला, अवघ्या 22 व्या वर्षी जगातील सर्वात तरुण अब्जाधीश हिंदुस्थानी वंशाच्या तरुणांनी झुकरबर्ग यांचा विक्रम मोडला, अवघ्या 22 व्या वर्षी जगातील सर्वात तरुण अब्जाधीश
जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनण्याचा मान फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना वयाच्या 23 व्या वर्षी मिळाला होता. त्यांचा हा विक्रम...
ठाणे महापालिकेचे 3 हजार 900 कोटी कुठे खर्च झाले? चौकशी करा, मुख्यमंत्र्यांना भाजपचे पत्र
शिंदे गटाची कोंडी करण्याचा भाजपचा डाव, गणेश नाईक ठाण्याचे निवडणूक प्रभारी
थंडीत करुन बघा असे मस्त दाटसर टेस्टी टोमॅटो सूप
मोदींनी आमंत्रण दिलंय; पुढील वर्षी हिंदुस्थानला येण्याचा विचार, डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान, IND-PAK युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चार
केसांच्या उत्तम वाढीसाठी घरच्या घरी बनवा हा ज्यूस, केस होतील घनदाट
हिवाळ्यात चहामध्ये आलं का घालायला हवं, जाणून घ्या