सोलापूरचे रिलस्टार अंजलीबाई आणि आकाशची प्रेमकहाणी रुपेरी पडद्यावर, ‘लव्ह यू मुद्दु’ साऊथचा सिनेमा उद्या प्रदर्शित होणार

सोलापूरचे रिलस्टार अंजलीबाई आणि आकाशची प्रेमकहाणी रुपेरी पडद्यावर, ‘लव्ह यू मुद्दु’ साऊथचा सिनेमा उद्या प्रदर्शित होणार

सोलापूरच्या अंजलीबाई शिंदे आणि आकाश नारायणकर हे लोकप्रिय रिलस्टार. त्यांच्या या रिअल लाईफची दखल साऊथच्या सिनेमाने घेतली आहे. या दोघांच्या प्रेमकहाणीवर साऊथचा सिनेमा येत आहे.

सोलापूरचे अंजली बाई शिंदे आणि आकाश नारायणकर खऱ्या आयुष्यात नवरा बायको आहेत. हे एक साधारण कपल आहे. जे काही वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर रिल्स बनवून अपलोड करायचे. त्यांचे आयुष्य सुखा समाधानाचे सुरू असताना एक दिवस अंजलीला ब्रेन ट्युमर असल्याचे निदान झाले आणि दोघंही हादरून गेले. अंजलीबाईला एक छोटा अपघात झाला होता. त्यात तिला डोक्याला सहा टाके पडले होते. या अपघातावेळी तिचे एक्सरे आणि एमआरआय केला असता तिच्या मेंदूला गाठ असल्याचे समजले. ही गाठ लहानपणापासून होती. जवळपास सर्वच डॉक्टरांनी अंजलीची आशा सोडली होती. मात्र, तिच्या नवऱ्याला हार मानली नाही. त्याचा प्रेमावर आणि स्वामीकृपेवर अपार विश्वास होता. त्याने नव्या उमेदिने प्रयत्न केले आणि डॉक्टरांनी अंजलीबाईवर शस्त्रक्रिया करून ती गाठ काढली. पण यात तिला अर्धांगवायूचा झटका आला आणि शरीराची एक बाजू निकामी झाली.

आकाशने तिची साथ कधीच सोडली नाही. त्याने तिची अहोरात्र सेवा केली आणि आता ती बरी होत आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी ते आई-बाबा होत असल्याची गुडन्यूजही दिली. त्यांची ही कहाणी एखाद्या सिनेमाच्या कथेसारखीच आहे. साऊथच्या सिनेमाला त्यांच्या खऱ्या आयुष्याची भुरळ पडली. त्यांनी त्यांच्या या खऱ्या आयुष्यावर ‘लव्ह यू मुद्दू हा सिनेमा केला आहे. साऊथचा अभिनेता सिद्दू आणि अभिनेत्री रेश्मा सिनेमाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गुरुवारी 7 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Heart Attack: हार्ट अटॅक टाळण्यासाठी दररोज किती वेळ चालायला हवं? Heart Attack: हार्ट अटॅक टाळण्यासाठी दररोज किती वेळ चालायला हवं?
दररोज व्यायाम करणे हे हृदयाच्या आरोद्यासाठी खूप फायदेशीर आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी दररोज किती वेळ...
रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर, लोकलच्या धडकेत चौघांचा मृत्यू
Pune News – पुण्यातील माजी नगरसेविका प्राची आल्हाट यांच्यासह पतीवर गुन्हा दाखल; डॉक्टरांची २४ लाखांची फसवणूक
Photo – मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
Ratnagiri News – रत्नागिरी शहरात ६४ हजार ७४६ मतदार आपला हक्क बजावणार, ६९ मतदान केंद्रांवर होणार मतदान
माझा दुरान्वयेही संबंध नाही, मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी; पार्थ पवारांवरील जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया
मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प, सीएसएमटी स्थानकावर सर्व लोकल ट्रेन उभ्या; कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे वाहतूक कोलमडली