मंदिराचा पुजारी विशिष्ट जातीचाच असणे आवश्यक नाही, केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय
मंदिरातील पुजारी विशिष्ट जात वा वंशाचा असणे आवश्यक नाही, तशी कोणतीही धार्मिक प्रथा नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. पुजारीच्या नियुक्ती प्रक्रियेत पात्र होण्यासाठी विशिष्ट जात वा वंशाची अट घालणे चुकीचेच आहे, असे न्यायालयाने नमूद केले आणि अखिल केरळ थंथरी समाजाची याचिका फेटाळून लावली.
n अखिल केरळ थंथरी समाज ही केरळमधील सुमारे 300 पारंपरिक थंथरी कुटुंबांचा समावेश असलेली एक नोंदणीकृत संस्था आहे. थथंरींमध्ये सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. संस्थेने प्रख्यात शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तरुण पिढीतील पुरोहितांना प्रशिक्षण दिले आहे. तसेच देवस्वोम बोर्डाच्या सहकार्याने पुरोहितांसाठी अभ्यासक्रम दिला आहे. पुजारी पदाच्या नियुक्तीकरिता पात्र होण्यासाठी थंथरींकडून प्रमाणपत्र देण्याची दीर्घकाळ चालत आलेली प्रथा आहे असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता, मात्र न्यायालयाने तो अमान्य केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List