मुलाच्या नावाने पुण्यात 40 एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा! काँग्रेसची मागणी

मुलाच्या नावाने पुण्यात 40 एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा! काँग्रेसची मागणी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीने पुण्यातील वतनाची ४० एकर जमीन भ्रष्ट मार्गाने बळकावल्याचे उघड झाले आहे. पार्थ पवार यांनी हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयात म्हणजे कवडीमोल भावाने हडप केली असून स्टँप ड्युटी फक्त ५०० रुपये दिली आहे. सरकारच्या ताब्यात असणा-या वतनाच्या या जमिनीचा व्यवहार झालाच कसा? असा प्रश्न विचारून भ्रष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची अमिडिया नावाची कंपनी असून या कंपनीने कोरेगाव पार्क भागातील जमीन अत्यंत अल्प किंमतीत घेतली आहे, ज्या कंपनीने हा व्यवहार केला त्या अमेडिया कंपनीचे भागभांडवल फक्त १ लाख रुपये आहे. अमेडिया कंपनीला या जागेत आयटी पार्क उभारायचे आहे आणि त्यास सरकारच्या उद्योग संचालनालयाने अवघ्या ४८ तासात मंजुरीही दिली. सरकारच्या ताब्यात असलेली वतनाची जमीन विकत घेता येते का? स्टॅम्प ड्युटी माफ का केली? असे प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित करून हा व्यवहार रद्द करावा व संपूर्ण व्यवहाराशी संबंधित अधिका-यांना तात्काळ निलंबित करून सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ‘सारखं मोफत कसं मागता, जरा हातपाय हलवा’ असा दम शेतक-यांना देणाऱ्या अजित पवार यांच्या दिवट्याच्या जमीन व्यवहारात तब्बल २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे. मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना अजित पवारांना वेदना का होतात, हे म्हणजे ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं’, असा प्रकार असून हा व्यवहार एक मोठा स्कॅम आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण – तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन, चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सोलापूरचे रिलस्टार अंजलीबाई आणि आकाशची प्रेमकहाणी रुपेरी पडद्यावर, ‘लव्ह यू मुद्दु’ साऊथचा सिनेमा उद्या प्रदर्शित होणार सोलापूरचे रिलस्टार अंजलीबाई आणि आकाशची प्रेमकहाणी रुपेरी पडद्यावर, ‘लव्ह यू मुद्दु’ साऊथचा सिनेमा उद्या प्रदर्शित होणार
सोलापूरच्या अंजलीबाई शिंदे आणि आकाश नारायणकर हे लोकप्रिय रिलस्टार. त्यांच्या या रिअल लाईफची दखल साऊथच्या सिनेमाने घेतली आहे. या दोघांच्या...
माझ्याकडे ती फाइल आलीच नाही आणि आमच्याकडून ती परवानगी दिली गेली नाही, पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी निलंबित तहसीलदारांची प्रतिक्रिया
गोलमाल है भय्या, दाल मे कुछ बडा काला है! पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी सुप्रिया सुळेंना मोठा संशय
दिल्लीत जशी जशी थंडी वाढेल तसा फुफ्फुसांवर…; शशी थरुर यांनी व्यक्त केली चिंता 
विभागीय ज्युदो स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज फोंडाघाटचे उज्ज्वल यश
राहुरीत भक्ष्याच्या शोधात असलेले दोन बिबट्या विहीरीत पडले, एक जिवंत तर दुसऱ्याचा मृत्यू
Black Eggs vs White Eggs : काळं अंड विरुद्ध सफेद अंड, प्रोटीनमध्ये खरा बादशाह कोण? कुठलं अंड शरीरासाठी जास्त फायद्याचं? जाणून घ्या