उद्धव ठाकरेंमुळे माझी एक एकर जमीन वाचली, ते बोलावतील तिथे ट्रक्टर घेऊन जाईन; आता एकच लक्ष्य शिवसेनेची मशाल

उद्धव ठाकरेंमुळे माझी एक एकर जमीन वाचली, ते बोलावतील तिथे ट्रक्टर घेऊन जाईन; आता एकच लक्ष्य शिवसेनेची मशाल

उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याने शेतकऱ्यांमध्ये शिवसेनेबद्दलचा आदर आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांना कर्जमाफी दिली होती. त्या कर्जमाफीमुळे आपली एक एकर जमीन वाचलेल्या एका शेतकऱयाने आज प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल अत्यंत आदर व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी कुठेही बोलावले तरी आपण ट्रक्टर घेऊन तिथे जाऊ असे त्यांनी सांगितले.

या शेतकऱयाने महायुती सरकारबद्दल तीव्र संतापही व्यक्त केला अतिवृष्टीमुळे आम्ही उद्ध्वस्त झालो, पण अजूनही पंचनामे झाले नाहीत. कोणतेही अधिकारी पाहणीसाठी आले नाहीत. पीक विम्याची तर थट्टाच करून ठेवली आहे. विम्याचे पैसे मिळाले; पण फक्त एक रुपया, सहा रुपये, सात रुपये, 29 रुपये असे पैसे आले. महायुती सरकारने शेतकऱयांची अक्षरशः चेष्टाच केली आहे. मी शिवसेनेचा माणूस नव्हतो, पण उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळालेल्या कर्जमाफीनंतर आमची जमीन वाचली. आताच्या सरकारमध्ये ताळमेळच नाही. मुख्यमंत्रीम्हणतात पैसे आले दुसरा उपमुख्यमंत्री म्हणतो काय गरज आहे पैसे द्यायची तर तिसरे उपमुख्यमंत्री म्हणतात आमच्याकडे याबद्दल काहीच नाही. ज्यांनी यांना मोठं केलं पदावर बसवलं त्यांनाच यांनी धोका दिला तर आमच्या सारख्या गरीब शेतकऱयांचं काय असा खोचक सवालही या शेतकऱयाने केला. आगामी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या मशाली शिवाय आम्ही कुठेही जाणार नाही आणि आमच्या तालुक्यात मशालच पेटेल असा विश्वासही या शेतकऱयाने व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला आम्ही दिलेली मते कुठे गेली हे आम्हालाच कळत नाही असे म्हणत त्यांनी मतदानात घोटाळा झाल्याचेही संशय व्यक्त
केला.

आजचा दौरा

सकाळी 10 वाजता

करजखेडा, धाराशीव

सकाळी 11.30 वाजता

भुसणी, औसा

दुपारी 2 वाजता

थोरलेवाडी, अहमदपूर

सायंकाळी 4 वाजता

पार्डी, लोहा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ सोप्या उपायांचा अवलंब केल्यास मुलांच्या जवळही फिरकणार नाही डास ‘या’ सोप्या उपायांचा अवलंब केल्यास मुलांच्या जवळही फिरकणार नाही डास
संध्याकाळ होताच डासांचा त्रास सुरू होतो. त्याच बरोबर आता दिवसाही डासांपासून स्वत:चे संरक्षण करणे आवश्यक आहे, कारण डास हे घराच्या...
पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने बडतर्फ, महिला डॉक्टर आत्महत्या
वेळापुरात सापडले छत्रपती शाहू महाराजांचे शिल्प
महाराष्ट्रात दगाबाज सरकार, गावागावात फलक लावा… जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यंत मत नाही! उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला
ब्राझिलच्या मॉडेलने केले 22 वेळा मतदान! हरयाणात 25 लाख मतांची चोरी; B ब्राझिलियन, J जनता, P पार्टी
राहुल गांधी यांचे सादरीकरण प्रत्येक हिंदुस्थानीने पाहण्यासारखे, आदित्य ठाकरे यांनी केले कौतुक
उद्धव ठाकरेंमुळे माझी एक एकर जमीन वाचली, ते बोलावतील तिथे ट्रक्टर घेऊन जाईन; आता एकच लक्ष्य शिवसेनेची मशाल