कोल्हापुरात फडणवीसांवर ऊसफेक, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकल्या! शेतकरी आक्रमक… फडणवीसांच्या भाषणावेळी घुसण्याचा प्रयत्न

कोल्हापुरात फडणवीसांवर ऊसफेक, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकल्या! शेतकरी आक्रमक… फडणवीसांच्या भाषणावेळी घुसण्याचा प्रयत्न

ऊसदरावरून सुरू असलेल्या आंदोलनाचा आणखी एक भडका उडाला असून, शेतकरी आक्रमक झाले आहेत. बुधवारी कोल्हापूर दौऱयावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऊसफेकीचा सामना करावा लागला. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शेतकऱयांनी उसाच्या कांडय़ा फेकल्या.

ऊसाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला होता. आज मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच बहुतांशी मंत्र्यांचा दौरा असल्याने सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, पण विमानतळावरून कार्यक्रमासाठी येताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्यावर अज्ञात शेतकऱयांनी उसाच्या कांडय़ा फेकण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही काळ पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी तत्काळ ताफ्यासमोर पडलेल्या उसाच्या कांडय़ा बाजूला केल्या.

g दुसरीकडे एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण अंतिम टप्प्यात येताच एका शेतकऱयाने अचानक ‘डी’ झोनमध्ये घुसून मुख्यमंत्र्यांसमोरच घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा आवाज निघण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला झडप घालून पकडत उचलून बाहेर नेले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाजपकडून आचारसंहितेचे उल्लंघन; काँग्रेसने केली तक्रार दाखल भाजपकडून आचारसंहितेचे उल्लंघन; काँग्रेसने केली तक्रार दाखल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता भंग झाल्याची पहिली तक्रार चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथून झाली आहे. काँग्रेसने...
थंडीत मधुमेहींनी काय खबरदारी घ्यायला हवी, वाचा
देश विदेश – भाजी विक्रेत्याला 11 कोटींची लॉटरी
शटडाऊनमुळे 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान, अमेरिकेच्या इतिहासात सर्वात मोठा बंद
चांदी दोन दिवसांत 3500 रुपयांनी घसरली
अमिताभ बच्चन यांनी 12 कोटींना विकले दोन फ्लॅट
प्रदूषणाने गाठली धोक्याची पातळी; दिल्ली, एनआरसी रेड झोनमध्ये