Nanded News – बस आणि खासगी ट्रॅव्हल्सचा अपघात, 27 प्रवासी जखमी
बस आणि खाजगी ट्रॅव्हल्सचा समोरासमोर अपघात होऊन 27 प्रवासी जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. बागवान टाकळी वळणावर सव्वा पाच वाजता हा अपघात झाला. जखमींपैकी आठ जणांना पुढील उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
मुखेड आगाराची बस मुखेडकडे चालली होती. यादरम्यान नांदेडहून देगलूरकडे येणार्या खाजगी ट्रॅव्हल्सने लेंडी नदी पुलाजवळील वळणावर समोरासमोर बसला जोराची धडक दिली. या धडकेत बसचा समोरील भाग अर्थात केबिनचा चेंदामेंदा झाला. यात बस चालक गंभीर जखमी झाला. दोन्ही वाहनातील 27 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर आठ प्रवाशांचे हातपाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी टीमसह घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवून वाहतूक सुरळीत केली. उर्वरित 19 रुग्ण किरकोळ जखमी असल्याने सध्या उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे उपचार घेत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List