मंगळसूत्र घेऊन महिलेला दिले पिवळे धातूचे मणी, चोरट्या महिलांना 24 तासांत अटक

मंगळसूत्र घेऊन महिलेला दिले पिवळे धातूचे मणी, चोरट्या महिलांना 24 तासांत अटक

सोन्याच्या मंगळसूत्रापेक्षा जास्त वजनाचे पिवळे धातू सोनेच असल्याचे भासवून परराज्यातील चोरट्या महिलांनी एका महिलेची फसवणूक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आंबेगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत चोरट्या महिलांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख २ हजारांचे मंगळसूत्र जप्त केले आहे. ही घटना 15 ऑक्टोबरला दुपारी सव्वाएकच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगरातील साई मित्रमंडळासमोर घडली होती.

आशाबेन मंगाभाई सरवय्या (वय 50, सासवड, पुणे मूळ रा. ढोला झोपडपट्टी, भावनगर, गुजरात) आणि सोनू बेन आकाशभाई सरवय्या (वय 30, गुजरात) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. तक्रारदार महिला 15 ऑक्टोबरला कात्रजमधील संतोषनगरात होती. त्यावेळी दोन्ही चोरट्या महिलांनी तिला पिवळ्या धातूचे मणी दाखविले. तुमच्या गळ्यातील मंगळसूत्रापेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे मणी असून, आम्हाला गावी जायचे आहे, सांगून महिलेला बतावणी केली. तिचा विश्वास संपादित केल्यानंतर चोरट्यांनी तिला पिवळे धातूचे मणी देऊन एक लाखांचे मंगळसूत्र चोरून नेले. मंगळसूत्र चोरीप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पथकाने कात्रज ते सासवड मार्गातील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, उपनिरीक्षक मोहन कळमकर, शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, नीलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, सुभाष मोरे, हरीश गायकवाड, राकेश टेकवडे, मपोशि दीक्षा मोरे यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मासिक पाळीपूर्वी होतोय हिरवा रक्तस्त्राव? व्हा सावध, डॉक्टरांकडून जाणून घ्या कारण मासिक पाळीपूर्वी होतोय हिरवा रक्तस्त्राव? व्हा सावध, डॉक्टरांकडून जाणून घ्या कारण
स्त्रीच्या मासिक पाळीच्या चक्रावर जीवनशैली, अन्न, झोप आणि इतर अनेक घटकांचा प्रभाव असतो. मासिक पाळी ठरलेल्या वेळेत येणं देखील फार...
कामोठ्यात इमारतीला भीषण आग, आई व मुलीचा होरपळून मृत्यू
शेअर बाजारात मूहूर्त ट्रेडिंगचा उत्साह; सेन्सेक्स, निफ्टी उच्चांक गाठणार?
H-1B Visa Row – हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना दिलासा; व्हिसा शुल्कातील सूट देण्याबाबत महत्त्वाची माहिती
सोसायट्यांच्या आवारातूनच आता करणार कचरा संकलन; विमाननगर, भवानी पेठेत यशस्वी प्रयोग
चंद्रपुरात बंदूक, जिवंत काडतूस, खंजीर जप्त; चार आरोपींना अटक
मंत्री, आमदारांच्या घरात लखलखाट; शेतकरी काळोखात, आमदार रोहित पवार यांचा आरोप