दहिसरमधील भूखंडावरील काम शिवसेनेने बंद पाडले, बेकायदेशीरपणे राडा-रोडा टाकून प्रदूषण
बेकायदेशीरपणे राडा-रोडा टाकून प्रदूषण वाढविणा-या दहिसरमधील भूखंडावर आज शिवसेनेने धडक दिली. बेकायदेशीरपणे येणारे माती व डेब्रिजचे ट्रक परत पाठवत काम बंद पाडले.
दहिसर गावठण, प्रमिलानगर, भीमाशंकर परिसरात तसेच स्मशानभूमीच्या परिसरातील दोन मोकळ्या भूखंडांवर बेकायदेशीरपणे राडा-रोडा टाकला जात आहे. तसेच पश्चिम रेल्वेने दहिसर ते भाईंदर या नव्या ट्रकवर मातीची भरणी मोठय़ा प्रमाणात सुरू केल्यामुळे वातावरणात प्रदुषण मोठय़ा प्रमाणात होतेय. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी या भूखंडावर धडक देऊन काम बंद पाडले. माती व डेब्रिजचे ट्रक परत पाठविले. यावेळी शिवसेना उपनेते, माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्यासह परिसरातील रहिवासी, शिवसेनेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. बोरिवली एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार, वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोकरे व रेल्वे प्रशासनाचे अधिकारी शिवम सोनी यांनी याबाबत योग्य ती दखल घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List