क्रीडा विश्वावर शोककळा, ऑलिम्पिक पदक विजेते गोलकीपर मॅन्युएल फ्रेडरिक यांचे निधन
हिंदुस्थानी हॉकी संघाचे माजी खेळाडू आणि ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे मॅन्युएल फ्रेडरिक यांचे निधन झाले. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी बंगळुरूतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 1972 म्युनिख ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानने नेदरलँडचा पराभव करत कांस्यपद जिंकले होते. त्या संघात मॅन्युएल फ्रेडरिक हे गोलकीपर होते. त्यानंतर 1978 मध्ये अर्जेंटिनामध्ये झालेल्या हॉकी वर्ल्डकपमध्येही ते हिंदुस्थानचे गोलकीपर होते. 2019 मध्ये त्यांना ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करणअयात आले होते. त्यांच्या निधनामुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.
मॅन्युएल फ्रेडरिक यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1947 रोजी केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील बारनासीरी जेथे झाला होता. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे ते केरळचे पहिले खेळाडू होते. त्यानंतर केरळकडून आणखी एका खेळाडूने ऑलिम्पिक पदक जिंकले. योगायोग म्हणजे तो खेळाडूही हिंदुस्थानच्या हॉकी संघाचा गोलकीपर होता. मॅन्युएल फ्रेडरिक यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा खेळाडू म्हणजे पीआर श्रीजेश हा आहे. त्याने टोकियो 2020 आणि पॅरीस 2024 ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते.
मॅन्युएल फ्रेडरिक हे बऱ्याच काळापासून बंगळुरूमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांना कर्करोग असल्याचे निदान झाले होते. एक वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि त्यानंतर ते डिप्रेशनमध्ये गेले होते. आता त्यांची निधन झाले असून त्यांची मुलगी फ्रेशना हिने पीटीआयशी बोलताना या वृत्ताची पुष्टी केली आहे.
About The Author
 
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
 
          
          
          
          
                 
                 
                 
                 
                 
                 
               
Comment List