“ऑस्ट्रेलियाला वाटत होतं, आणखी एक सेमीफायनल आरामात…”, हिंदुस्थानच्या पोरी फायनलमध्ये पोहोचताच सेहवागचा सिक्सर!
संधीचे सोनं करत हिंदुस्थानच्या महिला खेळाडूंनी सात वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमधून घरचा रस्ता दाखवला आणि तिसऱ्यांदा फायनलमध्ये धडक दिली. जेमिमा रॉड्रिग्ज हिने नाबाद 127 धावांची अविस्मरणीय खेळी केली. यामुळे तिचे आणि हिंदुस्थानच्या पोरींचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडला असून यात आजी-माजी पुरुष क्रिकेटरही आघाडीवर आहेत. हिंदुस्थानचा माजी विस्फोटक खेळाडू विरेंद्र सेहवाग यानेही सोशल मीडियावर पोस्ट करत ऑस्ट्रेलियाला डिवचले आहे.
‘ऑस्ट्रेलियाला वाटत होते की आणखी एक सेमीफायनल आरामात जिंकू आणि फायनलमध्ये पोहोचू. पण आपल्या मुलींना विचार केला की खरा धमाका करण्याची हीच वेळ आहे. सर्व टीकाकारांची धुलाई केली. काय खेळ दाखवला. तुमचा खूप अभिमान वाटतो’, असे ट्विट सेहवागने केले आहे.
Australia soch rahi thi ek aur semi-final hai, aaram se jeeto aur pahuncho Final- hamari ladkiyon ne socha yeh to mauka hai asli dhamaka karne ka! Saare criticism ko dho daala. Kya khel dikhaya. Proud of our women in blue. pic.twitter.com/oX5BfWK3PM
— Virrender Sehwag (@virendersehwag) October 30, 2025
सचिनने केले कौतुक
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही या ऐतिहासिक विजयाबद्दल हिंदुस्थानच्या महिला संघाचे अभिनंदन केले. दमदार वीज. जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर यांनी आघाडीवर राहून संघाला दिशा दाखवली. श्री चरणी आणि दीप्तीनेही दमदार गोलंदाजी करत सामना जिवंत ठेवला, असे सचिनने म्हटले.
Fabulous victory!
Well done @JemiRodrigues and @ImHarmanpreet for leading from the front. Shree Charani and @Deepti_Sharma06, you kept the game alive with the ball.
Keep the tricolour flying high.

pic.twitter.com/cUfEPwcQXn
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 30, 2025
विराट म्हणाला…
हिंदुस्थानच्या महिला संघाच्या ऐतिहासिक विजयावर विराट कोहली म्हणाला की, ऑस्ट्रेलिया सारख्या मजबूत संघाविरुद्ध आपल्या संघाने काय दमदार विजय मिळवला. मुलींना दमदार पाठलाग केला आणि जेमिमाने या बड्या लढतीत जबरदस्त कामगिरी केली. हिंमत, विश्वास आणि उत्कटतेचे अद्भूत प्रदर्शन.
What a victory by our team over a mighty opponent like Australia. A great chase by the girls and a standout performance by Jemimah in a big game. A true display of resilience, belief, and passion. Well done, Team India!
— Virat Kohli (@imVkohli) October 31, 2025
विजयी पाठलाग
दरम्यान, नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना सर्व बाद 338 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानच्या सलामीवीर शफाली वर्मा आणि स्मृती मानधना झटपट बाद झाल्या. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्जने दीडशेहून अधिक धावांची भागिदारी करत सामना हिंदुस्थानच्या बाजुने झुकवला. हरमन बाद झाल्यानंतर जेमिमाने सूत्र आपल्या हाती घेत शतक ठोकले आणि शेवटपर्यंत मैदानावर उभी राहून संघाला विजय मिळवून दिला.
About The Author
 
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
 
          
          
          
          
                 
                 
                 
                 
                 
                 
               
Comment List