दाऊद दहशतवादी नाही, त्याने मुंबईत स्फोट घडवले नाहीत! महामंडलेश्वर ममता कुलकर्णीचे दिव्य विचार

दाऊद दहशतवादी नाही, त्याने मुंबईत स्फोट घडवले नाहीत! महामंडलेश्वर ममता कुलकर्णीचे दिव्य विचार

‘मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार, कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिम हा दहशतवादी नाही, त्याने मुंबईत बॉम्बस्फोटही घडवले नाहीत…’ असे दिव्य विचार महामंडलेश्वर ममता कुलकर्णीने व्यक्त केले आहेत. मी कधीही दाऊदला भेटले नव्हते, अशी मखलाशीही तिने केली.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या कुंभमेळ्यात किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या गोरखपूरच्या दौर्‍यावर आहे. गोरखनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना तिने हे दिव्य विचार मांडले. अंडरवर्ल्ड डॉन, मुंबईत बॉम्बस्फोट घडवून पाकिस्तानात पळालेला कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिम हा दहशतवादी नसून त्याने बॉम्बस्फोटही घडवले नाहीत, असा दावा तिने केला. मी आता पूर्ण अध्यात्माकडे वळली असून माझा राजकारण किंवा चित्रपट उद्योगाशी संबंध नसल्याचेही ती म्हणाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mohammad Azharuddin – क्रिकेटनंतर राजकीय मैदानात नवी इनिंग, टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन झाला कॅबिनेट मंत्री Mohammad Azharuddin – क्रिकेटनंतर राजकीय मैदानात नवी इनिंग, टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन झाला कॅबिनेट मंत्री
टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद अझरुद्दीन याची नवीन इनिंग सुरू झाली आहे. तेलंगणा सरकारमध्ये अझरुद्दीन याने कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ...
राजस्थानमध्ये एटीएस आणि आयबीची मोठी कारवाई, तीन संशयित दहशतवाद्यांना अटक
सोने, चांदी आणखी स्वस्त होणार? अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचे जाणून घ्या संकेत…
“ऑस्ट्रेलियाला वाटत होतं, आणखी एक सेमीफायनल आरामात…”, हिंदुस्थानच्या पोरी फायनलमध्ये पोहोचताच सेहवागचा सिक्सर!
‘दूधगंगा–वेदगंगा’ देणार 3442 रुपये पहिली उचल
भाविकांसाठी पोलीस सज्ज
पंढरपूर शहरातील रस्ते होणार चकाचक; पाणी, ज्यूसच्या 12 लाख बाटल्यांचे वारकऱ्यांना होणार वाटप