खारघरमध्ये दोन बेकायदा इमारती जमीनदोस्त, सिडकोची धडक कारवाई
पावसाळ्यात अतिक्रमणविरोधी कारवाई बंद असल्याचा फायदा घेऊन अनधिकृत इमले उभे करणाऱ्या भूमाफियांवर आता सिडकोने वक्रदृष्टी टाकली आहे. अतिक्रमणविरोधी पथकाने खारघर येथील सेक्टर १३ मध्ये दोन अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवून ही दोन्ही बांधकामे जमीनदोस्त केली. या धडक कारवाईमुळे शहरात अनधिकृत इमले उभे करणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
खारघर येथे येथील सेक्टर १३ मधील भूखंड क्रमांक २२ आणि २३ वर विठाबाई पाटील यांनी पाच मजल्याची अनधिकृत इमारत उभी केली होती. ही इमारत उभी करताना कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. याच सेक्टरमध्ये हर्षल भगत यांनी भूखंड क्रमांक १० आणि ११ हडप करून या ठिकाणीही अनधिकृत इमारत बांधली होती. या दोन्ही अनधिकृत इमल्यांवर सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम नियंत्रक लक्ष्मीकांत डावरे यांनी धडक कारवाई केली. या दोन्ही अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. सिडकोच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अनधिकृत बांधकामधारकांची पळापळ उडाली आहे.
About The Author
 
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
 
          
          
          
          
                 
                 
                 
                 
                 
                 
               
Comment List