बेस्टच्या मनमानी कारभाराविरोधात भांडुपवासीय रस्त्यावर उतरले, शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन
भांडुप विभागातून जाणाऱया काही मिनी बस बंद करण्याचा घाट बेस्ट प्रशासनाने घातला आहे. त्यामुळे भांडुपवासीयांची मोठी गैरसोय होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने गुरुवारी जोरदार आंदोलन करण्यात आले.
भांडुपमधील बस क्र. 608 आणि 612 ही बससेवा कालपासून बंद करण्यात आली आहे. बस क्र. 605 आणि 606 येत्या एक तारखेपासून बंद करण्यात येणार आहेत. तसेच बस क्र. 607 च्या मार्गात बदल करण्यात आले आहे. नागरिकांना होणाऱया गैरसोयीबद्दल शिवसेना भांडुप विधानसभेच्या वतीने खासदार संजय दिना पाटील आणि विभागप्रमुख रमेश कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल पाटील, उपविभागप्रमुख राजेंद्र मोकल, सुनंदा वाफारे, संगीता गोसावी, संगिता पेडणेकर, शाखाप्रमुख किरण सुर्वे, राजेश सावंत, राजेश कदम, शरद उत्तेकर यांच्यासह भांडुपवासीय मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
About The Author
 
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
 
          
          
          
          
                 
                 
                 
                 
                 
                 
               
Comment List