Sindhudurg News – राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रज्योती जाधवने सुवर्णपदक पटकावले, प्रणव कुडाळकरची कांस्यपदकावर मोहोर
रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे झालेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर क्युरोगी आणि ११ व्या पूमसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत प्रज्योती जाधव हिने सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच प्रणव कुडाळकर याने कांस्यपदक पटकावर मोहोर उमटवली आहे.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्यावतीने देवाशिष नर, प्रणव कुडाळकर, अथर्व तेली, व मुलींमध्ये दुर्वा गावडे आणि प्रज्योती जाधव अशा एकूण पाच खेळाडूंनी राज्य स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते. त्यापैकी प्रज्योती जाधव हिने ५९ ते ६३ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले व बेंगलोर येथे ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेकरिता आपली जागा पक्की केली. तर प्रणव कुडाळकर याने ४५ ते ४८ वजनी गटात कांस्यपदक मिळवले. दोन्ही खेळाडू कणकवली नगरवाचनालय येथील मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अकॅडमीमध्ये राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. सर्व खेळाडूंचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी, सुधीर राणे, अमित जोशी, विनायक सापळे यांनी अभिनंदन केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List