Ratnagiri News – परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान, बांधावर पोहचत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद

Ratnagiri News – परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान, बांधावर पोहचत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद

जिल्ह्यात झालेल्या तीन दिवसातील पावसामुळे शेतकऱ्यांचे विशेषत: भातशेतीचे झालेले नुकसान पाहण्यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल हे आज (30 ऑक्टोबर 2025) थेट सोमेश्वर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शेतकऱ्यांनी भात कापून मळणीसाठी ठेवला होता. गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसामध्ये तो भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी जिंदल यांनी सोमेश्वर येथील शेतकऱ्यांच्या भातपिकाच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधून, या नुकसानीची माहिती घेतली.

जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करावेत. त्यासाठी गावातचं शिबिर घेवून कागदपत्रांची पूर्तता करुन घ्यावी. आवश्यक तेवढ्याच कागदपत्रांची मागणी करावी. विनाकारण कागदपत्रांची संख्या वाढवू नये. हेक्टरी साडेआठ हजार देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. ही मागणी शासनाला कळवली जाईल. त्यामध्ये वाढ करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून अन्य पिकांच्याबाबतही माहिती घेतली. तसेच कृषी पर्यटन क्षेत्राबाबतही चर्चा केली. गावामध्ये पंचनामे सुरू असून, आज अखेर साडेपाच हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली. या पाहणीवेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी जीवन देसाई, तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे, सरंपच दिपश्री पाटील, शेतकरी राजेंद्र चव्हाण, सुभाष भातडे, एकनाथ हरचेरीकर आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

INDW vs AUSW – जेमिमाचा शतकी तडाखा; हिंदुस्थानचा ऐतिहासिक पाठलाग, अंतिम फेरीत धडक INDW vs AUSW – जेमिमाचा शतकी तडाखा; हिंदुस्थानचा ऐतिहासिक पाठलाग, अंतिम फेरीत धडक
नवी मुंबईमध्ये टीम इंडियाच्या नावाचा जयघोष घुमला आणि त्याला कारण ठरली जेमिमा रोड्रिग्ज. पहिल्या दोन विकेट झटपट पडल्यानंतर चाहत्यांची धाकधुक...
मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे लाचार आणि चाटुगिरी, राज ठाकरे यांचा घणाघात
Ratnagiri News – कोसळणाऱ्या पावसामुळे केळशी पंचक्रोशीत भात शेतीचे प्रचंड नुकसान, हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला
Ratnagiri News – परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान, बांधावर पोहचत जिल्हाधिकाऱ्यांनी साधला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद
विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! CBSE बोर्डाने दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक केले जाहीर
Photo – पवईमध्ये थरारक ओलीसनाट्य आणि एन्काउंटर
Buldhana News – बुलढाणा मतदारसंघातील मतदार यादीत महाघोळ; हजारो दुबार व मयत नावे यादीत, शिवसेनेचा आरोप