गुवाहाटी कसोटीत आधी ‘टी टाईम’, मग ‘लंच ब्रेक’, कसोटीच्या वेळेत बदल करण्याचे बीसीसीआयचे संकेत

गुवाहाटी कसोटीत आधी ‘टी टाईम’, मग ‘लंच ब्रेक’, कसोटीच्या वेळेत बदल करण्याचे बीसीसीआयचे संकेत

कसोटी क्रिकेटमध्ये नेहमीप्रमाणे आधी लंच ब्रेक आणि नंतर टी टाईम घेतला जातो, पण गुवाहाटी कसोटीत सूर्यास्त लवकर होत असल्याने बीसीसीआय वेळ वाचवण्यासाठी या क्रमात बदल करण्याच्या तयारीत आहे.

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 22 नोव्हेंबरपासून सुरू होणारा दुसरा कसोटी सामना गुवाहाटीच्या बरसापारा मैदानावर होणार आहे. हिवाळय़ात ईशान्य भागात सूर्य लवकर मावळत असल्याने या कसोटीसाठी विशेष वेळापत्रक आखले जात आहे.

सामना सकाळी 9 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 4 वाजता संपणार आहे. पहिला ब्रेक सकाळी 11 ते 11.20 या वेळेत ‘चहापानासाठी’ असेल, तर लंच ब्रेक दुपारी 1.20 ते 2 या वेळेत ठेवण्याची योजना आहे. त्यानंतरचे सत्र दुपारी 2 ते संध्याकाळी 4 पर्यंत चालेल. गुवाहाटीत साधारण 4.15 वाजताच सूर्यास्त होतो. त्यामुळे दिवसाच्या उजेडाचा पूर्ण उपयोग व्हावा यासाठी हा ‘आधी टी टाईम, नंतर लंच’ असा अनोखा प्रयोग करण्यात येऊ शकतो,  अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. आसाम क्रिकेट संघटनेने मात्र स्पष्ट केले की, आम्हाला बीसीसीआयकडून अजून कोणतीही अधिपृत सूचना मिळालेली नाही. रणजी सामन्यांमध्ये आमचा पहिला ब्रेक सकाळी 11.15 वाजता लंचसाठी असतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mohammad Azharuddin – क्रिकेटनंतर राजकीय मैदानात नवी इनिंग, टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन झाला कॅबिनेट मंत्री Mohammad Azharuddin – क्रिकेटनंतर राजकीय मैदानात नवी इनिंग, टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन झाला कॅबिनेट मंत्री
टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद अझरुद्दीन याची नवीन इनिंग सुरू झाली आहे. तेलंगणा सरकारमध्ये अझरुद्दीन याने कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ...
राजस्थानमध्ये एटीएस आणि आयबीची मोठी कारवाई, तीन संशयित दहशतवाद्यांना अटक
सोने, चांदी आणखी स्वस्त होणार? अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचे जाणून घ्या संकेत…
“ऑस्ट्रेलियाला वाटत होतं, आणखी एक सेमीफायनल आरामात…”, हिंदुस्थानच्या पोरी फायनलमध्ये पोहोचताच सेहवागचा सिक्सर!
‘दूधगंगा–वेदगंगा’ देणार 3442 रुपये पहिली उचल
भाविकांसाठी पोलीस सज्ज
पंढरपूर शहरातील रस्ते होणार चकाचक; पाणी, ज्यूसच्या 12 लाख बाटल्यांचे वारकऱ्यांना होणार वाटप