केईएमच्या डॉक्टरवर प्राणघातक हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल
केईएम इस्पितळात कार्यरत असलेल्या डॉ. विशाल यादव यांच्यावर तिघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी इस्पितळाजवळील हनुमान मंदिरासमोर घडली. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
डॉ. विशाल यादव (26) हे केईएम इस्पितळातील सीव्हीटीएस विभागात हाऊस अधिकारी तर मुनज्जा खान (23) ही परफ्युनिस्ट म्हणून कार्यरत आहेत. या दोघांची मागील काही दिवसातच दोघांची चांगली मैत्री झाली. ते रिलेशनशिपमध्ये होते. गेल्या आठवडय़ात मुनज्जाच्या बहिणीला दोघांच्या रिलेशनशिपबद्दल माहिती झाले.
बुधवारी सकाळी आडेआठ वाजता डॉ. विशाल नेहमीप्रमाणे वॉर्ड क्रमांक 31 मध्ये काम करीत असताना मुनज्जाचा भाऊ फरिद, त्याचा मित्र नाबील आणि आणखी एक तरुण तेथे गेले. त्यांनी डॉ. विशाल यांना बोलायचे असल्याचे सांगत वॉर्डच्या बाहेर नेले.
मुनज्जाच्या लग्नाबद्दल बोलून सॉर्टआऊट करायचे आहे. तेव्हा तू आमच्या सोबत शिवडी येथील घरी चल असे सांगून विशाल यांना इस्पितळाजवळील हनुमान मंदिरासमोर नेले. तेथे तिघांनी त्यांना मारहाण करत शिवीगाळ केली. फरिद याने चाकूने विशालच्या पाठीवर तसेच डाव्या हाताच्या दंडावर वार केल्याचे डॉ. विशाल यांनी तक्रारीत म्हटले आहे.
About The Author
 
                 सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
 
          
          
          
          
                 
                 
                 
                 
                 
                 
               
Comment List