महाराष्ट्राच्या जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही; संजय राऊत यांचे विधान, 1 नोव्हेंबरला विराट मोर्चा निघणार
एक नोव्हेंबरला निवडणूक आयोगावर सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येईल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष असे सर्व प्रमुख पक्ष निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढतील. फॅशन स्ट्रीटवरून दुपारी एकच्या सुमारास हा मोर्चा निघेल आणि मेट्रोच्या मार्गे मुंबई महापालिकेजवळ व्यासपीठ उभे केले आहे, तिथपर्यंत पोहोचेल. प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन होईल आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या विरुद्ध पुढील रणनीतीची घोषणा केली जाईल, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
आम्ही 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय विराट मोर्चा काढणार असून महाराष्ट्रात आम्ही ज्या गोष्टी समोर आणल्या त्यावर निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागेल. आम्ही दिल्लीला आमची ताकद दाखवून देऊ. महाराष्ट्राच्या जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही हे निवडणूक आयोगाला दाखवून देऊ. मतदार यादीमध्ये लाखो बोगस नावे टाकली जात आहेत. ही कोणती लोकशाही आहे. याविरोधात आमची लढाई सुरू असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List