साय-फाय  – आयुष्याचा सोशल खेळ

साय-फाय  – आयुष्याचा सोशल खेळ

>> प्रसाद ताम्हनकर

सोसेल तेवढाच सोशल मीडिया वापरावा’ असे अनेकदा समाजधोरणी, मानसोपचार तज्ञ आणि ह्या विषयातले अभ्यासक गमतीने सांगत असतात. मात्र आता हे वाक्य फार गांभीर्याने घेण्याची वेळ आल्याचे हेच तज्ञ सांगत आहेत. सोशल मीडियाच्या अति वापराने आपले रोजचे आयुष्य जणू एक खेळ बनत चालले आहे अशी चिंता सध्या जगभरातील अभ्यासक व्यक्त करत आहेत. सध्याच्या काळासाठी ते ‘ल्युडिक सेंचुरी’ अर्थात खेळकेंद्रित शतक असा शब्दप्रयोग वापरतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण दिवसभरात करत असलेल्या प्रत्येक कामाकडे आपण आता एक खेळ किंवा स्पर्धा म्हणून बघायला लागलो असल्याची भीती ते व्यक्त करतात.

सकाळी उठल्या उठल्या आपण आधी हातात मोबाईल घेतो. पूर्वी एखादी महत्त्वाची बातमी किंवा संदेश आला आहे का हे जाणून घेण्यासाठी आपण तो हातात घ्यायचो; मात्र आता आपल्या कमेंटला किती लाईक्स मिळाले, आपली पोस्ट किती लोकांनी वाचली, किती लोकांनी शेअर केली, आपल्या रीलवर किती प्रतिक्रिया आल्या, किती रीच मिळाली ह्याची आपल्याला काळजी लागून राहिलेली असते आणि ती माहिती आपल्याला जाणून घ्यायची असते. आपल्याला एखादे अॅप वापरल्याने किती पॉइंट्स मिळाले, कोणत्या ग्रुपमध्ये आपल्याला कोणता बिल्ला (बॅज) मिळाला, ऑनलाईन गेममध्ये आपण कोणत्या नंबरवर पोहोचलो ह्याची माहिती आता जास्त महत्त्वाची वाटायला लागली आहे.

तज्ञ सांगतात की, पूर्वी स्पर्धा ही फक्त अभ्यासात असायची. दुपारी शाळा सुटली की संध्याकाळच्या वेळी मुलं गल्लीत, शेताच्या कडेला, मैदानात एकत्र जमायची आणि कबड्डी, लपाछपी, विटी दांडू असे विविध खेळ खेळायची. ह्या खेळातदेखील चुरस असायची, हार जीत असायची, पण सगळे एकत्र खेळायचे. या खेळात नंबर नव्हते, पदकं नव्हती आणि बक्षीसदेखील. मात्र ह्या खेळांची मजाच वेगळी असायची. शरीरे धावायची, मने आनंदित व्हायची आणि मैत्री अधिक घट्ट बनायची.

आताच्या काळात मात्र हे सगळे काही मोबाईलच्या छोटय़ा क्रीनमध्ये हरवून गेले आहे. क्रिकेट, फुटबॉल, कॅरम, बुद्धिबळ हे खेळ आता मोबाईलवर एकटय़ाने खेळले जायला लागले आहेत. खेळात, अभ्यासात प्रावीण्य मिळवायची धडपड आता मागे पडली आणि कोण कुठल्या सहलीचे फोटो टाकतो, कोण मोठी गाडी घेऊन व्हिडीओ करतो, कोण त्याच्या रीलमध्ये सर्वात जास्त माकडचाळे करतो अशी स्पर्धा सुरू झाली आहे. परदेशातील सहली, मोठय़ात मोठी गाडी, आधुनिक उपकरणे, मोठय़ा ब्रॅंडचे फोन दाखवण्याची चुरस वाढली आहे आणि ह्या सर्वात आपण आयुष्याचा खेळ बनवत आहोत ह्याकडे डोळेझाक केली जात आहे.

आयुष्याचा खेळ खेळत असताना खेळ कधी आपल्याशी खेळायला लागतो हेच आपल्याला कळत नाही. जेव्हा एखादा लहान मुलगा मोबाईलवर एखादी अॅडव्हेंचर गेम खेळत असतो तेव्हा फक्त त्याची बोटं चालत नसतात तर मेंदू जलद गतीने विचार करत असतो, पटापट निर्णय घेत असतो, अवघड अशा खेळातल्या संकटांचा सामना तो मुलगा करत असतो. कधी न पाहिलेली परिस्थिती, अडचणी ह्यांचा सामना करत असतो आणि हे सगळे करताना इतर ऑनलाईन प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यासाठी, वरचा क्रमांक मिळवण्यासाठी, लेव्हल पार केल्यावर मिळणारी बक्षिसे लुटण्यासाठी देखील धडपडत असतो. अशा खेळांचा मग त्याच्या रोजच्या आयुष्यातील वर्तनावरदेखील होत असतो हे अनेक प्रयोगांमध्ये सिद्ध झालेले आहे.

इंटरनेटच्या अति वापराने एकमेकांशी तुलना करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे आणि कमी बुद्धिमत्ता असलेली, गरीब परिस्थितीत वाढणारी मुले स्वतला कमनशिबी समजू लागली आहेत आणि त्यांचा आत्मविश्वासदेखील कमी होऊ लागला आहे या गंभीर मुद्दय़ाकडे तज्ञ प्रामुख्याने लक्ष वेधून घेत आहेत. इतर मुलांच्या पालकांकडे असलेल्या मोटारी, मुलांच्या आकर्षक सायकली, त्यांचे महागडे फोन, आधुनिक घडय़ाळे, गॅझेट्स, दर रविवारच्या पाटर्य़ांचे आणि सहलीचे फोटो त्यांच्यात अधिक असुरक्षिततेची आणि आपल्या आयुष्यात खूप काही कमतरता असल्याची भावना बळकट करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अनंत सिंह स्टेजवर पोहोचताच स्टेज कोसळला आणि पुढे जे घडले ते भयंकर अनंत सिंह स्टेजवर पोहोचताच स्टेज कोसळला आणि पुढे जे घडले ते भयंकर
सध्या बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून राजकीय पक्ष प्रचारात रंगले आहेत.  अशातच मोकामा विधानसभा मतदारसंघातून अनंत सिंह ही जोरदार प्रचार...
महाराष्ट्राच्या जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही; संजय राऊत यांचे विधान, 1 नोव्हेंबरला विराट मोर्चा निघणार
1 नोव्हेंबरला मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर सर्वपक्षीय विराट मोर्चा, डावे पक्ष मोठ्या संख्येने सहभागी होणार
शिंदेंचा पक्ष भाजपचं अंगवस्त्र, त्यांचा मालक दिल्लीत असल्यानं त्यांना वारंवार जावं लागतं; संजय राऊत यांचा हल्लाबोल
satara News – राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली; गृहखाते फेल
हे करून पहा… हॉटेलसारखी तडका डाळ घरी करा
साखर आयुक्तांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना वजनकाट्यांच्या तपासणीसाठी भरारी पथके