हिंदुस्थाननं रशियाकडून तेल आयात पूर्णपणे थांबवलीय! डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आसियान (ASEAN) शिखर परिषदेमध्ये सहभागी होत आहेत. मलेशियामध्ये ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली असून त्यानंतर दक्षिण कोरियामध्ये ट्रम्प चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतील. या भेटीपूर्वी त्यांनी हिंदुस्थानबाबत मोठे विधान केले. हिंदुस्थान रशियाकडून तेल आयात पूर्णपणे बंद केले असल्याचा दावा ट्रम्प यांनी पुन्हा केला.
रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लादला होता. त्यानंतर अमेरिकेने हिंदुस्थानवर रशियाकडून तेल खरेदी करू नये यासाठी दबाव टाकला. हळूहळू हिंदुस्थान रशियाकडून तेल आयात पूर्ण बंद करेल असे ट्रम्प म्हणाले होते. मात्र हिंदस्थानने यावर प्रतिक्रिया देताना ऊर्जेसंबंधीचे निर्णय राष्ट्रीय हितावर आधारित असतील असे म्हटले होते. यानंतर आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थानने रशियाकडून तेल आयात पूर्णपणे थांबवल्याचे म्हटले आहे. शनिवारी एअर फोर्स वन विमानात पत्रकारांशी संवाद साधतांनी त्यांनी हा पुनरुच्चार केला.
टीव्हीवरील जाहिरातीमुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला, कॅनडावर लादला 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ
चीन रशियाकडून तेलाची आयात मोठ्या प्रमाणावर कमी करत आहे, हे तुम्ही पाहिले असेल. हिंदुस्थानही आयात पूर्णपणे कमी करत आहे. आम्ही निर्बंधही लादलेले आहेत, असे ट्रम्प म्हणाले. याआधी अमेरिकेने रशियाच्या दोन मोठ्या खनिज तेल कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लादले होते. याचाच उल्लेख करत ट्रम्प यांनी हे विधान केले.
China cutting back ‘SUBSTANTIALLY’ on Russian oil — Trump
India halting purchases ‘COMPLETELY’
‘And we’ve done sanctions’ https://t.co/rkiVHQIJAS pic.twitter.com/xKBEI9v5CI
— RT (@RT_com) October 25, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List