Satara doctor suicide case – ही आत्महत्या नाही, तर व्यवस्थेने केलेला संस्थात्मक खून; राहुल गांधींचा घणाघात

Satara doctor suicide case – ही आत्महत्या नाही, तर व्यवस्थेने केलेला संस्थात्मक खून; राहुल गांधींचा घणाघात

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. संपदा मुंडे यांचे आत्महत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यासह दुसरा आरोपी प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणा भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेही नाव येत आहे. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही रविवारी या संदर्भात ट्विट केले आहे. जेव्हा सत्ताच गुन्हेगारांची ढाल बनते, तेव्हा न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची? असा उद्विग्न सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, महाराष्ट्रातील साताऱ्यात बलात्कार आणि छळाला कंटाळून डॉ. संपदा मुंडे यांनी केलेली आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या सद्सद्विवेकबुद्धीला हादरवून सोडणारी आहे. दुसऱ्यांचे दुःख दूर करण्याची आकांक्षा बाळगणारी एक होतकरू डॉक्टर मुलगी, भ्रष्ट सत्ता आणि प्रशासनातील गुन्हेगारांच्या छळाची शिकार ठरली.

ज्यांच्यावर जनतेचे गुन्हेगारांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी होती, त्याच व्यक्तीने या निष्पाप मुलीविरुद्ध सर्वात घृणास्पद गुन्हा केला. तिच्यावर बलात्कार आणि शोषण केले. अहवालानुसार, भाजपशी संबंधित काही बड्या धेंडांनी तिच्यावर भ्रष्टाचारासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्नही केला. सत्तेचे संरक्षण असलेल्या गुन्हेगारी विचारधारेचे घृणास्पद उदाहरण असून ही आत्महत्या नाही, तर व्यवस्थेने केलेला संस्थात्मक खून आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा संबंध, अंबादास दानवेंनी दिला पुरावा

जेव्हा सत्ताच गुन्हेगारांची ढाल बनते, तेव्हा न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी? डॉ. संपदा यांच्या मृत्युनेभाजप सरकारच्या अमानवी आणि असंवेदनशील चेहऱ्याचा बुरखा फाडला आहे, असे म्हणत न्यायाच्या या लढ्यात आम्ही पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत. देशातील प्रत्येक मुलीसाठी, आता भीती नाही, न्याय हवा आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अखेर मुदत संपलेली आडते असोसिएशन लागली कामाला, आडत्यांना ‘स्पीड’मध्ये सर्वसाधारण सभेची नोटीस अखेर मुदत संपलेली आडते असोसिएशन लागली कामाला, आडत्यांना ‘स्पीड’मध्ये सर्वसाधारण सभेची नोटीस
उच्च न्यायालयाने 15 नोव्हेंबरच्या आत श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनच्या निवडणुक प्रकरण निकाली काढण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांना दिले आहेत....
करूर चेंगराचेंगरी प्रकरणी सीबीआयकडून पुन्हा गुन्हा दाखल, विजय घेणार पीडित कुटुंबीयांची भेट
Video – पंतप्रधान मोदींसाठी तयार केली खोटी यमुना, पाईपने आणलं स्वच्छ पाणी
समुद्रकिनाऱ्यावर पोलीस सतर्क , दापोली पाठोपाठ गणपतीपुळे किनाऱ्यावर गस्त
बिहारमध्ये भाजपच्या माजी आमदाराच्या गाडीत सापडली दारू, पोलिसांकडून अटक
फलटण प्रकरणात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी किंवा मदत करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई झालीच पाहिजे! – वडेट्टीवर
रिल्ससाठी बाईकवर करत होता स्टंट, नंतर असे काही घडले आणि जीवावर बेतले