राष्ट्रीय महामार्गांवर आता क्यूआर कोड साईन बोर्ड, प्रवाशांना लोकेशनची माहिती; आपत्कालीन नंबर मिळणार
On
राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आता आणखी स्मार्ट आणि सुविधायुक्त होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय ) यासंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. लवकरच महामार्गावर क्यूआर कोड असलेले साईन बोर्ड लावले जाणार आहेत. हे साईन बोर्ड केवळ दिशा किंवा अंतर दाखवणार नाहीत, तर ते त्या लोकेशनशी संबंधित सर्व माहिती आणि आपत्कालीन नंबर उपलब्ध करून देतील.
साईन बोर्डवर कोणती माहिती असेल –
- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक व प्रकल्पाची साखळी.
- प्रकल्पाची लांबी, बांधकाम व देखभाल वेळापत्रक.
- महामार्ग गस्त, टोल व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक आणि निवासी अभियंता यांचे संपर्क.
- आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक 1033.
- जवळील रुग्णालये, पेट्रोल पंप, शौचालये, पोलीस स्टेशन, रेस्टॉरंट्स.
- टोल प्लाझाचे अंतर, ट्रक पार्किंग, पंक्चर दुरुस्ती, वाहन सेवा केंद्र व ई-चार्जिंग स्टेशन.
साईन बोर्ड कुठे बसवले जातील?
- टोल प्लाझाजवळ
- विश्रांती क्षेत्रांमध्ये
- ट्रक पार्किंग झोन
- महामार्गाच्या सुरुवातीच्या व शेवटच्या ठिकाणी
- महत्त्वाच्या स्थळांजवळ
15 नोव्हेंबरपासून नवीन टोल नियम
- 15 नोव्हेंबरपासून नवीन टोल नियम लागू होणार आहे.
- फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी दंड ः वैध फास्टॅग नसतानाही यूपीआयद्वारे टोल भरल्यास शुल्काच्या 1.25 पट रक्कम भरावी लागेल. यूपीआयऐवजी रोख रक्कम भरल्यास दुप्पट शुल्क भरावे लागेल.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
22 Oct 2025 00:06:25
क्रिकेट सामना हरल्याच्या तणावातून गाडीवरील नियंत्रण सुटले आणि सात नागरिकांना चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा जागीच...
Comment List