हरियाणात साकारतंय देशातील पहिलं अष्ट महालक्ष्मी मंदिर; चांदीच्या प्रतिमा, 200 कोटी रुपये खर्च

हरियाणात साकारतंय देशातील पहिलं अष्ट महालक्ष्मी मंदिर; चांदीच्या प्रतिमा, 200 कोटी रुपये खर्च

हरियाणाच्या हिसार शहरात पहिले अष्ट महालक्ष्मी मंदिर साकार होत आहे. या मंदिरातील देवीच्या सर्व प्रतिमा चांदीपासून तयार केल्या जातील. मागील चार वर्षांपासून मंदिराचे काम सुरू आहे. देशातील हे पहिले महालक्ष्मी मंदिर असेल जिथे आद्य महालक्ष्मीसोबत माता लक्ष्मीची आठ रूपे असतील.

हिसारच्या अग्रोहा शक्तिपीठाद्वारे अष्ट महालक्ष्मी मंदिर बांधण्यात येत आहे. 10 एकरांवर साकार होणाऱ्या मंदिरासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च होणार आहे. मंदिराची लांबी, रुंदी आणि उंची 108 फूट असेल. मंदिर उभारणीची जबाबदारी गुजरातचे आर्किटेक्ट सी. व्ही. सोमपुरा आणि आशिष सोमपुरा यांच्यावर आहे. त्यांनी उत्तर प्रदेशच्या राममंदिर उभारणीत महत्त्वाची भूमिका साकारली होती.

  • मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला चार मुख्य द्वार असतील. मंदिराच्या बांधकामात कुठेही लोखंडी सळ्यांचा वापर केलेला नाही. मंदिराच्या मध्यभागी 75 फुटांचा हॉल आहे.
  • मंदिराच्या गर्भगृहात माता लक्ष्मीची मुख्य प्रतिमा असेल. प्रतिमा 108 किलो चांदीपासून तयार केलेली असेल. लक्ष्मीमातेचे सिंहासन 108 किलो वजनी असेल. मंदिराच्या बांधकामात बन्सी पहाडपूर दगडांचा वापर करण्यात येईल.
  • अनोखी शिल्पकला आणि पारंपरिक वास्तुकलेचा संगम असलेले मंदिर येत्या काळात भाविकांसाठी श्रद्धा आणि आकर्षणचा केंद्रबिंदू ठरेल.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;