हरियाणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी स्वत:वर गोळी झाडून उचलले टोकाचे पाऊल
हरियाणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हरियाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय.एस.पुरन यांनी चंदिगडच्या सेक्टर 11मध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
पुरण यांची पत्नी आयएएस अधिकारी असून ती सध्या मुख्यमंत्री मनोहर लाल सैनी यांच्यासोबत जपानमध्ये आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणी आवश्यक ती कारवाई सुरु केली आहे. घटनास्थळाकडून कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. पोलीस अधिकारी घटनास्थळ आणि आजुबाजुच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.
वाय.एस. पुरण हे 2010 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते, त्यांची पत्नी अमनीत पी कुमार स्वतः हरियाणा केडरची आयएएस अधिकारी आहे. अमनीत सध्या परराष्ट्र सहकार्य विभागाचे आयुक्त आणि सचिव म्हणून काम करतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List