उभे राहून पाणी प्यायल्याने खरंच गुडघ्यांवर होतो वाईट परिणाम? सत्य काय, जाणून घ्या
पाणी पिणे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचे असते हे आपल्या सर्वांना माहित आहे. पुरेसे पाणी पिल्याने शरीर हायड्रेटेड राहतेच, शिवाय शरीराच्या इतर अवयवांनाही योग्यरित्या कार्य करण्यास मदत होते. दैनंदिन जीवनात, लोक त्यांच्या गरजा आणि सवयींनुसार पाणी पितात. पण पाणी पिताना काही सोप्या नियमांचे पालन करणे गरजेचे असते. जसं की अनेकदा आपण ऐकलं असेल की उभे राहून कधीही पाणी पिऊ नये. नेहमी बसून आणि हळू हळू पाणी प्यावे.
उभे राहून पाणी प्यायल्याने त्याचा थेट गुडघ्यांवर परिणाम होतो असं म्हटलं जातं. उभे राहून पाणी पिणे गुडघ्यांसाठी हानिकारक आहे असे मानले जाते. यामागील सत्य काय आहे हे जाणून घेऊयात तसेच उभे राहून पाणी पिण्याचे तोटे काय आहेत हे देखील पाहुयात.
आहारतज्ज्ञांचा सल्ला
सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या आहारतज्ज्ञ जुही अरोरा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून याबाबत सांगितले आहे. जुही यांनी सांगितले आहे की उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघ्यांचे नुकसान होऊ शकते किंवा इतर सांध्यांवर परिणाम होऊ शकतो ही कल्पना एक मिथक आहे. खरं तर, उभे राहून पाणी प्यायल्याने ते अन्ननलिकेतून थेट पोटात जाते. त्यामुळे त्याचा उभे राहून किंवा बसून पाणी पिण्याशी थेट संबंध नाही. जरी काही लोकांना उभे राहून घाईघाईत पाणी प्यायल्याने अपचन किंवा अस्वस्थता जाणवू शकते. परंतु त्याचा गुडघ्यांशी अजिबात संबंधित नाही. तसेच जुही यांनी सामान्यपणे दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.
उभे राहून पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक
आरोग्यासाठी उभे राहून पाणी पिणे तसे हानिकारकच असते. आयुर्वेदानुसार, यामुळे पाणी योग्यरित्या शरीरात शोषले जात नाही. ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. तथापि, याचा गुडघ्यांवर थेट परिणाम होतो याचा कोणताही पुरावा नाही.
उभे राहून पाणी पिण्याचे तोटे
पचनावर परिणाम होतो: उभे राहून पाणी पिल्याने अन्ननलिकेतून पाणी वेगाने पोटात जाते, ज्यामुळे पचन प्रक्रियेत अडथळा येतो, ज्यामुळे अपचन किंवा गॅसची समस्या उद्भवू शकते.
सांधेदुखीची कारणे: जेव्हा आपण उभे राहून पाणी पितो तेव्हा ते नसांवर ताण आणते, ज्यामुळे द्रव संतुलन बिघडते. यामुळे कालांतराने सांध्यामध्ये द्रव जमा होऊ शकतो, ज्यामुळे भविष्यात सांधेदुखी होऊ शकते.
शोषणाचा अभाव : उभे राहून पाणी पितो तेव्हा आवश्यक पोषक तत्वे आणि जीवनसत्त्वे यकृत आणि पचनसंस्थेपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
किडनीवर परिणाम : उभे राहून पाणी प्यायल्याने ते फिल्टर न करता थेट ओटी पोटात जाते. यामुळे पाण्यातील अशुद्धता मूत्राशयात जमा होते, ज्यामुळे किडनीच्या कार्यावर त्याचा परिणाम होतो आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढतो. तसेच किडनीचे आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो.
मज्जातंतूंचा ताण आणि द्रवपदार्थांचे असंतुलन : असेही म्हटले जाते की उभे राहून पाणी प्यायल्याने शरीरातील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते आणि नसांमध्ये ताण येतो.
तर अशापद्धतीने उभे राहून पाणी प्यायल्याने नक्कीच शरीरावर नक्कीच हानिकारक परिणाम होऊ शकतात.आयुर्वेदानुसार, पाणी नेहमी बसून, आरामात तसेच लहान घोटांमध्ये आणि हळूहळू प्यावे. घाई घाईत आणि उभ्याने किंवा चालताना पाणी पिऊ नये.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List