उज्जैनमध्ये देवी विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत पडली, 3 जण बेपत्ता

उज्जैनमध्ये देवी विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत पडली, 3 जण बेपत्ता

उज्जैन जिल्ह्याच्या बडनगरमध्ये गुरुवारी एक ट्रॅक्टर ट्रॉली चंबळ नदीत पडून मोठा अपघात झाला. यावेळी ट्रॉलीतील 20 जण नदीत पडले त्यापैकी 17 जणांना वाचविण्यात यश आले. मात्र तीन जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा तपास सुरु आहे.

घटनेची माहिती मिळताच, आसपासच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना गौतमपुरा रुग्णालयात पाठवले आहे. तर 3 बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंगोरियाजवळ लोकं देवी प्रतिमा विसर्जन करण्यासाठी गेले होते. दरम्यान एका मुलाने ट्रॅक्टर चावी फिरवून गाडी स्टार्ट केली आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसहित नदीत बुडाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आजपासून प्रभादेवीत दीपोत्सव; इतिहास, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडणार आजपासून प्रभादेवीत दीपोत्सव; इतिहास, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडणार
प्रभादेवीत पहिल्यांदाच ‘प्रभादेवी दीपोत्सव 2025’ या भव्य सांस्कृतिक सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. 17 ते 19 ऑक्टोबर यादरम्यान राजाभाऊ साळवी...
महागाई आणि बेरोजगारी तरीही दिवाळीच्या उत्साहाला उधाण
मतदार याद्यांवरील आक्षेपांचे काय करायचे? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे केंद्रीय आयोगाला पत्र, सर्वपक्षीय नेत्यांनी आवाज उठवताच हालचाली
नेस्लेच्या 16 हजार कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड
बुलढाण्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदार, शिंदे गटाचाही आरोप
शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले 1800 कोटी, घोषणा 31 हजार कोटींच्या पॅकेजची; पंचनाम्याअभावी 27 जिल्हे मदतीपासून वंचित
हिंदुस्थान रशियाकडून आता तेल खरेदी करणार नाही! ट्रम्प यांनी पुन्हा केली मोदींची पोलखोल