Chandrapur News – एकच मिशन ST आरक्षण…, राजुरा शहरात बंजारा समाजाच्या वतीने काढण्यात आला मोर्चा
बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत (ST) आरक्षण मिळावे या मागणीसाठी चंद्रपुरात बंजारा समाज एकवटला. राजुरा शहरात बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने बंजारा समाज बांधव मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी विविध जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येत आहेत. आज (29 सप्टेंबर 2025) राजुरा शहरात जिल्हाभरातून हजारो बंजारा समाज बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत राजुरा उपविभागीय कार्यालयावर धडकले. सेवालाल महाराजांच्या जयघोषात राजुरा शहर दुमदुमले. ‘हैदराबाद गॅझेट’प्रमाणे बंजारा समाज एसटी प्रवर्गात येतो; परंतु महाराष्ट्रात एसटी प्रवर्गाची सवलत नसल्याने बंजारा समाजाने एसटी प्रवर्गात आरक्षण मिळविण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List