अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; जोएल मोकिर, फिलिप अघियन आणि पीटर हॉविट करण्यात येईल सन्मानित
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. या वर्षी नवोपक्रम-चालित आर्थिक विकासाच्या संकल्पनेवरील कार्यासाठी जोएल मोकिर, फिलिप अघियन आणि पीटर हॉविट यांना संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला आहे. गेल्या वर्षी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार डॅरॉन असेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए. रॉबिन्सन यांना देण्यात आला होता.
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराला बँक ऑफ स्वीडन पुरस्कार म्हणून ओळखले जाते. याची स्थापना १९६८ मध्ये स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने केली होती. विजेत्यांची निवड रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसकडून केली जाते. डायनामाइटचा शोध लावणाऱ्या आणि पाच नोबेल पुरस्कारांची स्थापना करणाऱ्या अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार दिला जातो.
हा पुरस्कार अशा व्यक्तींना दिला जातो ज्यांनी वैज्ञानिक शोध, साहित्यिक कार्य किंवा शांतता निर्माण याद्वारे मानवतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र किंवा शरीरक्रियाविज्ञान, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार दिला जातो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List