एसटी कामगारांचे उद्यापासून आझाद मैदानात आंदोलन; संयुक्त कृती समिती आक्रमक

एसटी कामगारांचे उद्यापासून आझाद मैदानात आंदोलन; संयुक्त कृती समिती आक्रमक

एसटी कामगारांनी प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रलंबित थकीत 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळावी, यासाठी एसटीतील विविध 18 संघटनांच्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीतर्फे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. हे आंदोलन सोमवारपासून आझाद मैदानावर सुरू होणार आहे. आर्थिक मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटना कृती समितीने दिला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावरच हे आंदोलन होणार आहे.

कृती समितीमधील सर्व श्रमिक संघटनांची बैठक रविवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत कामगार संघटनांनी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. बैठकीला कृती समितीमधील महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे हिरेन रेडकर, एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे, हणमंत ताटे, श्रीरंग बरगे, पांडुरंग वाघमारे, दादाराव डोंगरे, बंडू फड, संतोष गायकवाड, राजेंद्र मोजाड, विनोद गजभिये, अरुण वीरकर, गौतम कांबळे, विश्वनाथ जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

एसटीमधील महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीमधील 16 संघटना व अन्य एक महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस या संघटनांनी सोमवारपासून आंदोलनाच्या नोटीस दिल्या आहेत. त्यानुसार आता हे आंदोलन मुंबई सेंट्रलऐवजी आझाद मैदानावर होणार आहे. दिवाळी तोंडावर आली असून लवकरच शाळांना सुट्टी सुरू होणार असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यातून काही मार्ग तत्काळ निघणे गरजेचे आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत थकीत देणी रक्कम हप्ता सुरू करण्यात आला नाही तर धरणे व ठिय्या आंदोलन बेमुदत सुरू राहील, असेही कृती समितीच्या बैठकीत ठरले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

न्यायमूर्ती सूर्य कांत होणार सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश, भूषण गवई यांनी केली शिफारस न्यायमूर्ती सूर्य कांत होणार सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश, भूषण गवई यांनी केली शिफारस
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांची शिफारस केली आहे. तसे शिफारस पत्र सरन्यायधीशांनी कायदा मंत्रालयाकडे...
ढगाळ हवामानासह पावसाचा आंबा मोहोरावर परिणाम,  पालवी कुजण्याची शक्यता 
हिंदुस्थानची आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट खेळाडू रोहिणी कलम घरात मृतावस्थेत आढळली, क्रीडा विश्वात खळबळ
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी वडिलांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला, तीन दिवस सुरू होते अघोरी प्रकार
चेहरा सुंदर दिसण्यासाठी हे फूल वरदानापेक्षा कमी नाही, वाचा
चेहरा सुंदर दिसण्यासाठी नानाविध उपाय करुन थकलात, आता वापरा या डाळीचे पीठ, रिझल्ट पाहून थक्क व्हाल
मराठी भाषा भवन रखडलंय, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत नाही; पण भाजप मुख्यालयाची फाईल राफेलच्या वेगाने हलली! – संजय राऊत