‘या’ आहेत देशातील 5 सर्वात स्वस्त CNG कार, मिळणार जबरदस्त मायलेज; किमती ४.६२ लाख रुपयांपासून सुरू; पाहा संपूर्ण लिस्ट…

‘या’ आहेत देशातील 5 सर्वात स्वस्त CNG कार, मिळणार जबरदस्त मायलेज; किमती ४.६२ लाख रुपयांपासून सुरू; पाहा संपूर्ण लिस्ट…

जर तुम्ही दिवाळीत नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचा बजेट कमी आहे तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील पाच सर्वात स्वस्त सीएनजी कारबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला जबदस्त मायलेज आणि फीचर्स मिळणार.

Maruti S-Presso CNG

मारुती एस-प्रेसो सीएनजीची प्रारंभिक किंमत ४.६२ लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते. या कारमध्ये १.० लीटर के-सिरीज पेट्रोल-सीएनजी इंजिन आहे. जे ५६ पीएस पॉवर आणि ८२.१ एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार ३२.७३ किमी/किलो मायलेज देते, असं बोललं जात आहे. ज्यामुळे ही कार आपल्या सेगमेंटमध्ये खूपच किफायतशीर बनते. ड्युअल एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस, मागील पार्किंग सेन्सर्स, ईएसपी, ७-इंच टचस्क्रीन, अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले या यासारखे फीचर्स ग्राहकांना या कारमध्ये मिळणार.

Maruti Alto K10 CNG

मारुती अल्टो के१० सीएनजीची किंमत ४.८२ लाख रुपयांपासून सुरू होते. यात ९९८ सीसी के१०सी इंजिन आहे. जे ५६ पीएस पॉवर आणि ८२.१ एनएम टॉर्क जनरते करते. ही कार ३३.८५ किमी मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. यात सहा एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, ईएसपी, रियर सेन्सर्स आणि हिल होल्ड असिस्ट सारखे फीचर्स ग्राहकांना मिळतात.

Tata Tiago CNG

टाटा टियागो सीएनजीची किंमत ५.४९ लाख रुपयांपासून सुरू होते. यात १.२-लिटर रेव्होट्रॉन इंजिन आहे. जे ७२ पीएस पॉवर आणि ९५ एनएम टॉर्क जनरते करते. ही कार २६.४९ किमी/किलो (मॅन्युअल) आणि २८.०६ किमी/किलो (एएमटी) मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. या कारला ४-स्टार जीएनसीएपी सेफ्टी रेटिंग देखील मिळालेली आहे, ज्यामुळे ही कार सर्वात सुरक्षित बजेट कारपैकी एक बनते.

Maruti Wagon R CNG

मारुती वॅगन आर सीएनजीची प्रारंभिक किंमत ५.८९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. यात ९९८ सीसी के१०सी इंजिन आहे. जे ५६ पीएस पॉवर आणि ८२.१ एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार ३४.०५ किमी/किलो (एआरएआय) मायजेत देते, असा दावा कंपनीने केला आहे. यात सहा एअरबॅग्ज, एबीएस, ईएसपी, मागील सेन्सर्स आणि हिल होल्ड सारखे सेफ्टी फीचर्स मिळतात.

Maruti Celerio CNG

मारुती सेलेरियो सीएनजीची किंमत ५.९८ लाख रुपयांपासून सुरू होते. यात ९९८ सीसी के१०सी इंजिन आहे. जे ५६ पीएस पॉवर आणि ८२.१ एनएम टॉर्क जनरेट करते. यात ३४.४३ किमी/किलो मायलेज मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. सेलेरियोमध्ये सहा एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, ईएसपी, रियर सेन्सर्स, ७-इंच टचस्क्रीन, कीलेस एंट्री आणि ऑटो एसी सारखे फीचर्स ग्राहकांना मिळणार.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल
पूजा करताना, कोणत्याही धार्मिक विधी करताना तसेच सणांच्यादिवशी दिवे निश्चितच लावले जातात. पूजेदरम्यान शुद्ध देशी तुपाच्या दिव्यांचे फार महत्त्व सांगितले...
नॉनवेज,पिझ्झा-बर्गरपेक्षादेखील हा गोड पदार्थ लिव्हरसाठी असतो सर्वात धोकादायक
माजी आमदार मुन्ना शुक्ला यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; एकाला अटक
ये डर अच्छा है! सोन्याचा स्ट्रॉ हरवल्याचे दुःख नाही; बायकोच्या शिक्षेची भीती वाटते…जाणून घ्या घटना
लक्ष लक्ष दिव्यांनी कोकणची दक्षिण काशी उजळली ! कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
मोठा अनर्थ टळला ! स्फोटानंतर रुळांना नुकसान; गाड्या उशीरा धावल्या
Bihar Election 2025 – तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत अशोक गहलोत यांची घोषणा