IND vs AUS – विराट कोहली सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद, एडलेडमध्येही ‘भोपळा’ फोडू शकला नाही

IND vs AUS – विराट कोहली सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद, एडलेडमध्येही ‘भोपळा’ फोडू शकला नाही

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात एडलेडच्या ओव्हल मैदानावर दुसरा वन डे सामना सुरू आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने आजची लढत जिंकून मालिका बरोबरीत करण्याचा प्रयत्न हिंदुस्थानचा असणार आहे. या लढती ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा हिंदुस्थानकडून सलामीला आहे. मात्र हिंदुस्थानला लागोपाठ दोन धक्के बसले. आधी शुभमन गिल 9 धावा काढून बाद झाला, तर विराट कोहलीही आल्या पावली माघारी परतला. विराट कोहली सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला.

ओव्हलवर हिंदुस्थानने सावध सुरुवात केली. पहिल्या 6 षटकांमध्ये गिल-रोहितने फक्त 17 धावा केल्या. यानंतर सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात गिल झेवियर बार्टलेटच्या गोलंदाजीवर मिचेल मार्शकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. विराटचे हे आवडते मैदान असल्याने यावर तो मोठी खेळी करणार अशी आशा चाहत्यांना होती. मात्र झेवियर बार्टलेटने यावर पाणी फिरवले आणि विराटला शून्यावर पायचीत पकडले. बाद झाल्यानंतर पवेलीयनकडे जात असताना विराटला एडलेडवर उपस्थित प्रेक्षकांनी स्टँडिंग ओवेशन दिले.

दुसऱ्या वन डे साठी अंतिम 11 खेळाडू

हिंदुस्थान – रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया – मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, झेवियर बार्टलेट, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठा अनर्थ टळला ! स्फोटानंतर रुळांना नुकसान; गाड्या उशीरा धावल्या मोठा अनर्थ टळला ! स्फोटानंतर रुळांना नुकसान; गाड्या उशीरा धावल्या
आसाममध्ये मोठ्या अपघाताचा अनर्थ टळला आहे. ईशान्य सीमावर्ती रेल्वेच्या अलीपुरद्वार विभागातील सालाकाटी आणि कोक्राझार स्थानकांदरम्यान गुरुवारी रेल्वे रुळांवर एक संशयास्पद...
Bihar Election 2025 – तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत अशोक गहलोत यांची घोषणा
दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात हवेतच बिघाड; सतर्कता दाखवत वैमानिकाने विमान दिल्लीकडे वळवले
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात संगमेश्वरचा 114 वर्ष जुना ब्रिटीशकालीन डाकबंगला जमीनदोस्त होणार
ट्रेंडिंग ‘कार्बाइड गन’ पडली महागात; दिवाळीत खेळताना १४ मुलांनी डोळे गमावले
भाजप संधीसाधू, यूज अँड थ्रो हेच त्यांचे धोरण; अंबादास दानवे यांची सडकून टीका
‘या’ आहेत देशातील 5 सर्वात स्वस्त CNG कार, मिळणार जबरदस्त मायलेज; किमती ४.६२ लाख रुपयांपासून सुरू; पाहा संपूर्ण लिस्ट…