ये डर अच्छा है! सोन्याचा स्ट्रॉ हरवल्याचे दुःख नाही; बायकोच्या शिक्षेची भीती वाटते…जाणून घ्या घटना

ये डर अच्छा है! सोन्याचा स्ट्रॉ हरवल्याचे दुःख नाही; बायकोच्या शिक्षेची भीती वाटते…जाणून घ्या घटना

चहाचा शौकीन असलेल्या एका व्यक्तीने चहा पिण्यासाठी 12 लाखाचा स्ट्रॉ बनवून घेतला. मात्र एक दिवस तो स्ट्रॉ त्याच्याकडून हरवला. चहा पिण्यासाठी आवडता स्ट्रॉ हरवल्याने त्रस्त  झालेल्या व्यक्तीने पोलिसात धाव घेत मदत मागितली. त्याला चिंता स्ट्रॉ हरवल्याची नव्हती तर चिंता बायको काय शिक्षा देईल याची होती.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट नुसार, गोल्डन स्ट्रॉ शोधण्यासाठी त्या माणसाने पोलिसांची मदत घेतली. पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतातील ही घटना सध्या चर्चेत आहे. शॉ नावाच्या माणसाला चहा पिण्याची इतकी आवड होती की त्याने त्यासाठी सोन्याचा स्ट्रॉ बनवला. एके रात्री शॉ त्याच्या पॅन्टच्या खिशात स्ट्रॉ घेऊन इलेक्ट्रिक बाईकवरून घरी जात होता. त्यानंतर तो एका खडबडीत मॅनहोलवरून गाडी चालवत असताना स्ट्रॉ बाहेर पडला. शॉ घाबरला आणि एक तास शोध घेतल्यानंतर पोलिसांना फोन केला. दोन पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना हे ऐकून धक्का बसला की शॉ त्यांना100 ग्रॅम वजनाचा सोन्याचा स्ट्रॉ शोधत होता. शॉने अधिकाऱ्यांना सांगितले की जर त्याला ते सापडले नाही तर त्याची पत्नी घरी परतल्यावर त्याला शिक्षा करेल.

पोलीस त्या स्ट्रॉचा शोध घेत असताना ते रस्त्याच्या कडेला पडलेले आढळले. शॉने हा स्ट्रॉ बनवण्यासाठी 90 हजार युआन दिले होते. फक्त एका महिन्यात सोन्याच्या किमतीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने, आता त्याची किंमत 100,000 युआन झाली आहे. भरपूर शोधल्यानंतर मॅनहोलपासून सुमारे 100 मीटर अंतरावर फूटपाथवर पडलेला सोन्याचा स्ट्रॉ पोलिसांना दिसला. हरवलेला स्ट्रॉ सापडल्याने शॉच्या आनंदाला पारावर उरला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘ही’ आसने करा अन् डोकेदुखीला दूर पळवा, रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय ‘ही’ आसने करा अन् डोकेदुखीला दूर पळवा, रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय
तुमच्यापैकी अनेकजण डोकेदुखीने त्रस्त असाल. काही लोक डोकेदुखीकडे दुर्लक्ष करत असतात, मात्र हे मायग्रेन किंवा हाय ब्लड प्रेशर या गंभीर...
संजय गांधी नॅशनल पार्कात हिट अँड रन, दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत
IND W Vs NZ W – दिवाळी धमाका; स्मृती आणि प्रतिकाने न्यूझीलंडला फोडून काढलं, खणखणीत शतके आणि ऐतिहासिक भागीदारी
बिहारनंतर पाच राज्यांत होणार SIR, निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू
IND W Vs NZ W – टीम इंडियाची धुवांधार फटकेबाजी सुरू असतानाच पावसाची हजेरी, सामना थांबला
तेजस्वी यादव महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, पाटण्यात झाला एकमुखी निर्णय
अमेरिकेत हिंदुस्थानी ट्रक चालकाने अनेक गाड्यांना उडवलं, तिघांचा मृत्यू; घटनेचा थरार कॅमेऱ्यामध्ये कैद