जागतिक बाजाराकडून सकारात्मक सिग्नल; शेअर बाजाराची मुसंडी, ऑल टाईम हाय गाठण्याची शक्यता
अमेरिकेने हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ लादल्याने दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. आता अमेरिकेकडून टॅरिफमध्ये कपात करण्याचे संकेत मिळाले आहेत. तसेच दोन्ही देशातील व्यापार करार होणार असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. मात्र, दोन्ही देशांकडून याला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. जागतिक बाजाराताील सकरात्मक संकेत, ट्रम्प याचे टॅरिफ कपातीचे संकेत आणि दोन्ही देशात व्यापार करार होत असल्याचे वृत्ताने शेअर बाजाराने जोरदार मुसंडी घेतली असून बाजार आता ऑल टाईम हा गाठेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
या वृत्तामुळे शेअर बाजारात शानदार वाढ दिसून आली आहे. निफ्टी २६,००० च्या वर व्यवहार करत आहे, तर सेन्सेक्स ८५,००० च्या वर पोहोचला आहे. अमेरिकेसोबत करार होण्याची आशा वाढल्यानंतर ही वाढ झाली आहे. अमेरिकेतून सकारात्मक संकेत मिळाल्याने शेअर बाजारात गुरुवारी शानदार वाढ दिसून आली आहे. निफ्टी २६,००० च्या वर उघडला, तर सेन्सेक्स ८५,००० च्या वर उघडला. त्यानंतर सेन्सेक्स ७२० अंकांनी वाढून ८५,१४८ वर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी २०० अंकांनी वाढून २६०७० च्या वर व्यवहार करत आहे. अमेरिकेच्या टॅरिफच्या घोषणानंतर आयटी क्षेत्रात मोठी घसरण झाली होती. आता आयटी शेअर झपाट्याने वधारत आहेत. आयटी क्षेत्रातील शेअरमध्ये २% वाढ झाली आहे.
बीएसईच्या टॉप ३० शेअर्सपैकी २९ शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे, तर एका शेअरमध्ये घसरण होत आहे. इन्फोसिसच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली आहे, ३% वाढ झाली आहे. फक्त झोमॅटोच्या शेअर्समध्ये थोडीशी घसरण दिसून येत आहे. आयटी शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. इन्फोसिस ३%, एचसीएल टेक २.५०% वर आहे. याव्यतिरिक्त, टीसीएसमध्ये १% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
हिंदुस्थान -अमेरिकेत व्यापार करार होणार असल्याचे वृत्त मिळत आहे. अमेरिका हिंदुस्थानवरील ५० टक्के कर १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विचार करत आहे. असे झाले तर शेअर बाजाराला आणखी फायदा होऊ शकतो. त्यामुळे बाजारात तेजी आहे. तसेच रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपणार असल्याचे वृत्तानेही बाजारात तेजी आहे. आयटी क्षेत्रात २.३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. खाजगी बँकिंग क्षेत्रात १ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एफएमसीजी देखील १.५० टक्क्यांनी वाढले आहे. बाजारात तेजी असली तरी सोने-चांदीची झळाळी ओसरत असल्याचे दिसत आहे. बाजारातील तेजीने पुन्हा एकदा गुतंवणूकदार बाजाराकडे वळत असल्याने सोन्या-चांदीची मागणी घटल्याने त्यांचे भाव घसरत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List