दाभोळ बंदर अस्वच्छतेच्या घेऱ्यात,  मेरीटाईम बोर्डाचे दुर्लक्ष ; अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी 

दाभोळ बंदर अस्वच्छतेच्या घेऱ्यात,  मेरीटाईम बोर्डाचे दुर्लक्ष ; अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी 

दाभोळ बंदर धक्का येथे सार्वजनिक वापरांसाठी 36 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सुलभ शौचालय हे पूर्णपणे घाणीने माखले आहे . मेरी टाईम बोर्डाच्या मालकीच्या असलेल्या आणि घाणीने माखलेल्या या स्वच्छतागृहातील स्वच्छता करण्याचे साधे सौजन्यदेखील मेरीटाईम बोर्ड दाखवत नाही. त्यामुळे स्वच्छतागृहातील घाणीच्या दुर्गंधीने डासांची उत्पत्ती वाढून एखाद्या संसर्गजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव पसरला तर त्याची सारी जबाबदारी मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी घेतील का असा संतप्त सवाल रहिवाशांकडून होत आहे.

दापोली तालुक्यातील ऐतिहासिक बंदर असलेल्या दाभोळ गावातील बंदर धक्का येथे मेरीटाईम बोर्डाने 36 लाख रूपये खर्च करून एक स्वच्छतागृह बांधले आहे. सुलभ शौचालयात पाण्याच्या सोयीसाठी आणखीन 10 लाख रूपये खर्च केले आहेत. अशा तन्हेने तब्बल 46 लाख रूपये खर्च करून उभारलेल्या सुलभ शौचालयाची मेरीटाईम बोर्डाकडून स्वच्छताच केली जात नाही. त्यामुळे स्वच्छतागृहात बाटल्यांचा खच पडला आहे. झाडलोट केली जात नसल्याने स्वच्छतागृहात कमालीची दुर्गंधी येत आहे. त्यामुळे महिलावर्गाला या स्वच्छतागृहाचा वापर करताच येत नाही. त्यामुळे येथून प्रवास करणारे संताप व्यक्त करत आहेत.

स्थानिकांचे आरोग्य धोक्यात 

महिला आणि पुरुषांसाठीची स्वतंत्र सोय असलेल्या सुलभ शौचालयाचा वापर हा सार्वजनिक वापरासाठीच्याच उद्देशाने करण्यात आला होता. दाभोळ धक्का बंदर येथे आलेल्या पर्यटकांची मासेमारांची तसेच दाभोळपलीकडे गुहागरातील धोपावेत जाण्यासाठी धक्क्यावर आलेल्या लोकांच्या लघुशंकांसाठीची सुलभ सोय व्हावी यासाठी शासनाने 36 लाख रुपये शौचालय बांधण्यासाठी आणि पाण्याच्या सोयीसाठी 10 लाख रुपये असे एकूण 46 लाख रुपये खर्च केले आहेत मात्र घाणीच्या साम्राज्याने पूर्णपणे व्यापलेल्या आणि दुर्गंधींचा वास येणाऱ्या सुलभ शौचालयात बाटल्यांचा खच पडला आहे. त्यामुळे कोणालाही लघुशंका करणे येथे करणे शक्यच नाही. शिवाय येथे डासांची उत्पत्ती होऊन एखाद्या साथजन्य रोगाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या सा-या परिस्थितीला जबाबदार असलेल्यांवर शासनाने कारवाईचा बडगा उचलणे गरजेचे आहे.

 36 लाख रुपये खर्च संशयास्पद 

शौचालयाच्या बांधकामासाठी 36 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. 36 लाखात सर्व सोयी युक्त आणि प्रशस्त असे शौचालयाचे बांधकाम अपेक्षित असताना या शौचालयाच्या बांधकामासाठी झालेला 36 लाख रुपये खर्च हा संशयास्पद आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि पाण्यासाठी 10 लाख रुपये खर्च केले असताना पाण्याची सोय आहे कुठे आणि असेलच तर मग शौचालय स्वच्छतेचा अभाव का ? कि ज्यामुळे शौचालयात इतकी दुर्गंधी पसरावी आणि घाणीच्या साम्राज्यामुळे लघुशंका करण्यास शौचालयात जावून 2 मिनिटे थांबून राहणे म्हणजेच जीव गुदमरून जाण्याचा प्रकार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND W Vs NZ W – अगदी थाटात; न्यूझीलंडचा 53 धावांनी धुव्वा उडवत हिंदुस्थानच्या पोरींची सेमी फायनलमध्ये धडक IND W Vs NZ W – अगदी थाटात; न्यूझीलंडचा 53 धावांनी धुव्वा उडवत हिंदुस्थानच्या पोरींची सेमी फायनलमध्ये धडक
सेमी फायनलमध्ये पोहचण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा सामन्यात टीम इंडियाने बाजी मारत न्यूझीलंडचा 53 धावांनी धुव्वा उडवला आहे. प्रथम फलंदाजांनी...
‘ही’ आसने करा अन् डोकेदुखीला दूर पळवा, रामदेव बाबांनी सांगितला खास उपाय
संजय गांधी नॅशनल पार्कात हिट अँड रन, दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत
IND W Vs NZ W – दिवाळी धमाका; स्मृती आणि प्रतिकाने न्यूझीलंडला फोडून काढलं, खणखणीत शतके आणि ऐतिहासिक भागीदारी
बिहारनंतर पाच राज्यांत होणार SIR, निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू
IND W Vs NZ W – टीम इंडियाची धुवांधार फटकेबाजी सुरू असतानाच पावसाची हजेरी, सामना थांबला
तेजस्वी यादव महागठबंधनचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा, पाटण्यात झाला एकमुखी निर्णय