बँकांमधील 1.84 लाख कोटीला कुणी वाली नाही! सरकार कॅम्प लावून पैसे परत करणार

बँकांमधील 1.84 लाख कोटीला कुणी वाली नाही! सरकार कॅम्प लावून पैसे परत करणार

देशभरातील बँकांमध्ये 1.84 लाख कोटी रुपये पडून आहेत. या रकमेवर कुणी दावा केलेला नाही. हे पैसे मूळ दावेदारांना किंवा त्यांच्या वारसांना, कुटुंबाला परत केले जातील. यासाठी विशेष मोहिमेंतर्गत प्रत्येक जिह्यात शिबिरे राबवून लोकांना त्यांची रक्कम मिळवण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

बँका, आरबीआय आणि इतर नियामकांकडे 1.84 लाख कोटी रुपयांचे दावेदार नसलेली आर्थिक संसाधने पडून आहेत. ‘आपली पूंजी, आपले अधिकार’ या तीन महिन्यांच्या देशव्यापी मोहिमेद्वारे हे धन खऱया मालकांकडे परत दिले जाणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. 4 ऑक्टोबरला गांधीनगर येथे ‘आपली पूंजी, आपले अधिकार’ या मोहिमेचा शुभारंभ झाला.

बेवारस धनाचे प्रमाण किती

डीएफएस (वित्तीय सेवा विभाग) नुसार, बँका, आरबीआय आणि आयईपीएफ (निवेशक शिक्षण आणि संरक्षण निधी) यांच्याकडे 1.84 लाख कोटींचे दावेदार नसलेले धन जमा आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत 75 हजार कोटी रुपये आरबीआयच्या डिपॉझिटर एज्युकेशन फंडमध्ये हस्तांतरित झाले आहेत. ही रक्कम पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सरकार त्याची संरक्षक आहे. दावेदारांना योग्य पुरावे सादर केल्यास ताबडतोब हस्तांतरण होईल, ज्यामुळे नागरिकांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असे सीतारमण यांनी स्पष्ट केले.

डिजिटल पद्धतीनेही दावा कसा कराल?

  • दाव्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने डिजिटल पोर्टल्सचा वापर सुरू केला आहे.
  • UDGAM पोर्टल ः रिझर्व्ह बँकेचे UDGAM (अनक्लेम्ड डिपॉझिट गेटवे टू अॅक्सेस इन्फॉर्मेशन) पोर्टल नागरिकांना दावा न केलेली रक्कम शोधण्यास मदत करते.
  • दावा प्रक्रिया ः नागरिकांनी योग्य ती कागदपत्रे घेऊन जवळच्या बँका किंवा संबंधित संस्थांकडे जावे. वित्तमंत्र्यांनी सल्ला दिला आहे की, तुम्ही एकदा दावा दाखल करताच तुम्हाला तुमचा पैसा मिळतो.
  • तुम्हीही आरबीआयच्या UDGAM पोर्टलवर जाऊन तुमच्या कुटुंबातील किंवा तुमच्या नावाने दावा न केलेली कोणतीही रक्कम आहे का, हे तपासा.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार! ‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’’ हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी टप्पा आहे.
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे 
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स