‘आषाढी’प्रमाणे कार्तिकी यात्रेत भाविकांना सोयी-सुविधा, 26 ऑक्टोबरपासून पांडुरंगाचे 24 तास दर्शन

‘आषाढी’प्रमाणे कार्तिकी यात्रेत भाविकांना सोयी-सुविधा, 26 ऑक्टोबरपासून पांडुरंगाचे 24 तास दर्शन

कार्तिकी शुद्ध एकादशी 2 नोव्हेंबर रोजी असून, यात्रा कालावधी 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत सुमारे आठ ते दहा लाख भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येतात. येणाऱ्या वारकरी, भाविकांना मंदिर समितीकडून आषाढी यात्रेप्रमाणेच सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

दरम्यान, यात्रा कालावधीत वारकऱ्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे सुरळीत व सुलभ दर्शन व्हावे, यासाठी परंपरेनुसार 26 ऑक्टोबरपासून 24 तास दर्शन उपलब्ध करण्यात येणार आहे.

कार्तिकी यात्रापूर्व नियोजनाबाबत मंदिर समितीची बैठक श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली. बैठकीस सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर), ऍड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, पृथ्वीराज राऊत, डॉ. विलास वाहणे, श्रीनिवास गुजरे, तेजस्विनी आफळे आदी उपस्थित होते.

औसेकर महाराज म्हणाले, 2 नोव्हेंबर रोजी पहाटे 2.20 वाजता उपमुख्यमंत्री व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते सपत्नीक ‘श्रीं’ची शासकीय महापूजा होणार आहे. या यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे सुरळीत व सुलभ दर्शन व्हावे, यासाठी परंपरेनुसार 26 ऑक्टोबरपासून 24 तास दर्शन उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच मंदिर जतन-संवर्धन कामाबाबत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजेंद्र शेळके यांनी बैठकीत कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ‘श्रीं’ची शासकीय महापूजा करण्याची प्रथा आहे. मात्र, मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणत्या मान्यवरांच्या हस्ते पूजा करावी, याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविणे, तसेच 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत 24 तास दर्शन उपलब्ध करून देणे यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND vs AUS – पहिल्या लढतीआधी ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ‘बाद’, कांगारुंना एकामागोमाग पाच धक्के IND vs AUS – पहिल्या लढतीआधी ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ‘बाद’, कांगारुंना एकामागोमाग पाच धक्के
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात 19 ऑक्टोबरपासून तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी यजमान संघाला मोठा धक्का...
पुण्यातील जैन हॉस्टेलचा भूखंड लाटण्याचा डाव, जैन समुदायाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
भय इथले…मरणानंतरही यातना; उदगीर तालुक्यातील वागदरीमध्ये अंत्यसंस्कारासाठी नदीतून प्रवास
पूरग्रस्त शेतकऱ्यांना सढळ हातानं मदत करण्याची राज्य सरकारची तयारी नसल्यानं ‘काळी दिवाळी’ साजरी करावी लागतेय! – शरद पवार
नेपाळनंतर मादागास्करमध्ये Gen Z क्रांती; लष्कराच्या हाती सत्ता, कर्नल बनले देशाचे राष्ट्रपती
मुंबईत ठाकरे यांचाच उत्सव होणार; मराठी माणसाच्या एकजुटीचा दीपोत्सव साजरा होणार – संजय राऊत
भ्रष्ट मंत्र्यांचा मलीदा, थैल्या दिल्लीत पोहचत आहे, त्यामुळे महाराष्ट्रात भ्रष्ट मंत्र्यांना अभय आहे; संजय राऊत यांचा आरोप