शेवटच्या चार दिवसांत साडेसहा लाख मतदार वाढले कसे? काँग्रेसचा आयोगाला सवाल
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या 4 महिन्यांत राज्यात 41 लाख मतदार वाढणे ही गंभीर बाब आहे. 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या चार दिवसांत 6 लाख 55 हजार 709 मते कशी वाढली, असा सवाल काँग्रेसने निवडणूक आयोगाची आकडेवारी सादर करत केला आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली त्या वेळी राज्यात 9 कोटी 63 लाख 69 हजार 410 मतदार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केले होते. पेंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी कार्यपद्धतीप्रमाणे उमेवारी अर्ज भरण्याच्या 10 दिवस अगोदरपर्यंत नवीन मतदार नोंदणी ही सुरू ठेवली जाते. त्यानुसार सुरू ठेवलेल्या मतदार नोंदणीत 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत तब्बल 6 लाख 55 हजार 709 मतदारांची वाढ होऊन राज्यातील एपूण मतदारसंख्या 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 वर पोहचली. शेवटच्या चार दिवसांत झालेली ही मतदार नोंदणी अत्यंत संशायास्पद असल्याचे काँग्रेस प्रवत्ते सचिन सावंत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List