स्वदेशी ‘तेजस’ लढाऊ विमान आज आकाशात झेपावणार

स्वदेशी ‘तेजस’ लढाऊ विमान आज आकाशात झेपावणार

नाशिकजवळील ओझरच्या एचएएल प्रकल्पात तयार झालेले स्वदेशी बनावटीचे पहिले ‘तेजस एमके-1ए’ हे लढाऊ विमान उद्या शुक्रवारी आकाशात झेपावणार आहे. हे उड्डाण हिंदुस्थानी संरक्षण दलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडविणार आहे.

देशाच्या संरक्षण सामर्थ्याचे प्रतीक असलेले तेजस एमके-1ए हे लढाऊ विमान हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) नाशिकजवळील ओझर येथील प्रकल्पात तयार झाले आहे. ते आता शुक्रवारी सकाळी ओझरच्याच भूमीतून पहिले उड्डाण घेण्यासाठी सज्ज झाले आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत एचएएलच्या विमान उत्पादन विभागात सकाळी 11 वाजता हा सोहळा संपन्न होईल. त्यांच्या हस्ते तेजस विमान हवाई दलाकडे सुपूर्द केले जाणार आहे. तसेच तेजसच्या तिसऱ्या उत्पादन साखळीचे आणि एचटीटी-40 या प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचे उद्घाटनही पार पडणार आहे.

1964 मध्ये एचएएलच्या ओझर येथील प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. येथे मिग, सुखोई प्रकारच्या विमानांची आतापर्यंत निर्मिती होत आहे. तसेच येथे विमानांचा देखभाल, दुरुस्तीचा विभागही कार्यरत आहे. आता तेजसच्या निर्मितीमुळे एचएएल ओझर प्रकल्पाला आणखी एक महत्त्वाची ओळख मिळाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;