साडेचार हजार महिलांना मिळाले रोजगाराचे साधन; शिलाई मशीन, घरघंटी, मसाले कांडप यंत्रांचे वितरण

साडेचार हजार महिलांना मिळाले रोजगाराचे साधन; शिलाई मशीन, घरघंटी, मसाले कांडप यंत्रांचे वितरण

मुंबई महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लॉटरी पद्धतीने लाभार्थी महिलांना शिलाई मशीन, घरघंटी, मसाला कांडप मशीन वाटप करण्यात येते. दिंडोशी विधानसभेतील 9 प्रभागांमधील साडेचार हजार महिलांना अशा रोजगार उपयुक्त साधनांचे वितरण शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.

महापालिकेच्या महिला सक्षमीकरण मोहिमेला गती मिळाली आहे. सुनील प्रभू महापौर असताना सर्वप्रथम जेंडर बजेट आणले होते. त्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला बळ मिळाले. त्याचा विशेष उल्लेख पालिका अधिकाऱयांकडून करण्यात आला. सहाय्यक आयुक्त पुंदन वळवी, सीडीओ पुलकर्णी, माजी उपमहापौर सुहास वाडकर, तुळशीराम शिंदे, कार्यकारी अभियंता मकरंद खरात यावेळी उपस्थित होते.

या माध्यमातून रोजगार करावा, असे आवाहन प्रभू यांनी केले. महिलांना फुलवाती, अगरबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकताही त्यांनी अधोरेखित केली. पालिकेच्या पाकि&ंगच्या जागा कंत्राटदारांना देण्याऐवजी महिला बचत गटांना देऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;