दिवाळीनिमित्त शिवसेनेतर्फे फराळ साहित्य, सुगंधी उटणे वाटप
दिवाळी सणाचे औचित्य साधून शिवसेनेच्यावतीने नागरिकांना दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य आणि सुगंधी उटण्याचे वाटप ठिकठिकाणी करण्यात येत आहे.
शिवसेना शाखा क्र. 117च्या विक्रोळी विधानसभा युवती विभाग अधिकारी अल्पिता गावडे-वारंग यांनी विभागामध्ये सुगंधी उटणे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते उटणे वाटप करण्यात आले. या वेळी बाबा कदम, रश्मी पहुडकर, अपूर्वा महाला, ज्योती छाबरा, भार्गवी चोरमुले, रवींद्र महाडिक, दीपाली पाटील, मामी मंचेकर, रजनी पाटील, अरुण सावंत, संचिता शिंदे, योगेश पेडणेकर, दिशा पायपुते, योगेश पेडणेकर, श्वेता पावसकर, अनिल वारंग, राहुल गावडे आदी उपस्थित होते.
शिवसेना भायखळा विधानसभेच्यावतीने माजी नगरसेवक रमाकांत रहाटे यांच्यावतीने सुगंधी उटणे व उपविभागसंघटक कीर्ती शिंदे यांच्यावतीने पणत्यांचे वाटप करण्यात आले. विधानसभा समन्वयक बबन गांवकर, विधानसभा प्रमुख सुरेखा राऊत, चंदना साळुंके, उषा पाटोळे, अंजना औटी, शिल्पा म्हात्रे, राम गावडे, पांडुरंग हांडे, नितीन गंधाळे, सुजाता घाटगे, सूर्यकांत शिरवडकर, दत्ता पवार, फर्नांडिस, विजया पवार, सायली शिंदे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख तुकाराम (सुरेश) पाटील आणि उपविभागप्रमुख अजित गुजर यांच्या मार्गदर्शनाने शाखा क्र. 131चे शाखाप्रमुख विशाल चावक यांच्या संकल्पनेतून सुगंधित उटणे वाटप करण्यात आले. या वेळी विधानसभा कार्यालय प्रमुख प्रकाश वाणी, विधानसभा संघटक अशोक वंडेकर, प्रसाद कामतेकर, हृदयनाथ राणे, श्रीराम पाल, वसंत पाटील, नीलम कदम, पूनम परब, संदीप मयेकर, उदय पाटील, संतोष कदम, कमलेश राजपूत उपस्थित होते.
शिवसेना मलबार हिल विधानसभा पुरस्पृत सिंह गर्जना सेवा मंडळाच्या विद्यमाने दिवाळी फराळ साहित्याचे विनामूल्य वाटप विधानसभा सहसमन्वयक प्रकाश मिसाळ यांच्यावतीने करण्यात आले. यावेळी उपनेते अरुण दुधवडकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, मंडळाचे अध्यक्ष मधुकर मोंडे, शाखाप्रमुख राजेंद्र गायकवाड, संतोष घरत, शाखा संघटक योगिता पेंढारकर आदी उपस्थित होते.
साडेचार हजार महिलांना मिळाले रोजगाराचे साधन; शिलाई मशीन, घरघंटी, मसाले कांडप यंत्रांचे वितरण
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List