आयुष्यातला अर्धा वेळ वाहतूककोंडीतच जातोय…मोदीजी… आम्हाला आत्महत्या करू द्या! वाहतूककोंडीला कंटाळलेल्या गावकऱ्यांनी मागितले इच्छामरण
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील खड्डे, वाहतूककोंडीला कंटाळलेल्या गावकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चक्क इच्छामरणाची मागणी केली आहे. आमच्या आयुष्यातला अर्धा वेळ वाहतूककोंडीतच जातोय. त्यामुळे आम्ही जिवंत असलो तरी मेल्यासारखेच वाटते.. आता जगून करायचं तरी काय? त्यामुळे मोदीजी, आम्हाला आत्महत्या करू द्या, या मागणीचे पत्र त्रस्त नागरिकांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहे. वसईच्या ससूनवघरमधील संतप्त गावकऱ्यांनी आज रस्त्यावर उतरून सरकारच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त केला.
महामार्गावरील वसई, नायगाव, चिंचोटी परिसरातील खड्डेमय रस्ते आणि सततच्या वाहतूककोंडीमुळे स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या त्रासाबद्दल वारंवार निवेदने देऊनही काहीच उपाययोजना केली जात नसल्याने या निष्क्रियतेविरुद्ध ससूनवघर गावातील शेकडो महिला आणि ग्रामस्थांचा उद्रेक झाला.
पत्रे थेट दिल्लीला रवाना
प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या नावाने स्वतंत्र पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केली. प्रत्येकाने ही पत्रे पोस्टाद्वारे थेट नवी दिल्लीला पाठवली आहेत. ग्रामस्थांनी या पत्रांमध्ये तीव्र भावना व्यक्त केल्या असून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा आम्हाला आत्महत्येसाठी परवानगी द्या. अशी मागणी त्यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List