वेधक – नाचणीच्या स्वादाची जगभर ओळख

वेधक – नाचणीच्या स्वादाची जगभर ओळख

>> पराग पोतदार

कुसुंबी गावच्या आरोग्यदायी बहुगुणी नाचणीचा स्वाद जगभर पोहोचला आहे. यंदा कुसुंबीकरांनी नाचणीची विक्रमी लागवड करीत येथील नाचणीपासून खमंग पदार्थ तयार केले. महिलांनी तयार केलेले हे पदार्थ आता सातासमुद्रापार गेले आहेत. उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध झाले आहे. यामुळेच कुसुंबी गाव ‘नाचणीचे गाव’ म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाऊ लागले आहे.

जवली तालुक्यातील काळेश्वरीदेवीची ओळख असलेले कुसुंबी हे गाव ‘नाचणीचे गाव’ म्हणून महाराष्ट्रभर ओळखले जाऊ लागले आहे. आरोग्यदायी बहुगुणी नाचणीची कुसुंबीकरांनी यंदा विक्रमी लागवड केली आहे. तसेच येथील महिलांनी तयार केलेले नाचणीचे खमंग पदार्थ सातासमुद्रापार गेले आहेत. त्यामुळे महिलांना उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध झाले आहे.

कुसुंबी गाव जावली तालुक्यात दक्षिणेस डोंगराच्या पायथ्याला आहे. गावातील कुसुंबी मुरा, चिकणवाडी या डोंगरावरील वस्त्यांमध्ये अतिपावसाच्या प्रदेशात नाचणीची लागवड केली जाते. निसर्गाची उधळण असणाऱया या गावात डोंगरावर बेसाल्टचा खडक आणि त्यातून वाहून येणाऱया पाण्यात मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक असे खनिजांचे पोषक घटक पिकांना दर्जेदार बनवतात. त्यातच हे पीक घेण्याची पद्धत पारंपरिक आहे. गुरे, शेळ्या, मेंढय़ांच्या मलमूत्रामुळे मातीचा पोतदेखील चांगला आहे. त्यामुळे येथे रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. शेती उतारावर असल्याने पाणी निचरा उत्तम प्रकारे होतो. यामुळे नाचणी पिकाचे उच्च प्रतीने पोषण होते. हलक्या प्रतीच्या व पाण्याचा निचरा होणाऱया जमिनीत नाचणी पीक चांगले येते.

नाचणीच्या लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. या वर्षी जावली तालुक्यात 410 हेक्टर क्षेत्रापैकी 129 हेक्टर क्षेत्रावरच नाचणीची लागवड झाली आहे. भविष्यात हे पीक राहील की नाही असा प्रश्न असताना कुसुंबीकरांनी मात्र यंदा नाचणीची विक्रमी लागवड केली आहे.

यातून शेतकऱयांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेत ‘नाचणीचे गाव’ म्हणून बहुमताने ठराव पारित केला. यासाठी आर्थिक व तांत्रिक मदत अमेरिकास्थित महाराष्ट्र फाऊंडेशन व वॉर्ड संस्थेच्या सहकार्याने मिळाली. तसेच भविष्यात पाचवड ते खेड रत्नागिरी अशा मोठय़ा होणाऱया रस्त्यामुळे येणाऱया तीन वर्षांत कुसुंबीच्या पर्यटन क्षेत्रामध्ये वाढ होऊन इथल्या तरुणांना रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे. आज कुसुंबीमध्ये महिला फार्मर प्रोडय़ुसर नावाने कंपनी सुरू असून या माध्यमातून नाचणीवर प्रक्रिया केलेले अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. त्यांची बाजारपेठेत विक्री केली जाते.

गावात पूर्वी तीस ते पस्तीस टन नाचणी उत्पादन होत होते. जिल्हा प्रशासनाच्या नावीन्यपूर्ण गाव योजनेत नावणीचे गाव म्हणून कुसुंबीची निवड झाल्यानंतर कुसुंबीत नाचणीचे उत्पादन दुप्पट झाले. या वर्षी शंभर टनांपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. बचत गट निर्मिती, नाचणी प्रक्रिया उद्योग, प्रशिक्षण शिबिरे, नाचणीच्या पदार्थांची रेसिपी सराव असे उपक्रम घेऊन आहारात पोषक म्हणून नाचणी सुप्रसिद्ध झाल्याने पदार्थांना मागणी वाढली आहे. पदार्थ निर्मितीसाठी गुजरात, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. नाचणीचे पौष्टिक लाडू, शेवया, चिवडा, भडंग, कुकीज, मिठाई, केक मागणीप्रमाणे बनवून दिले जात आहेत. कृषी विभागाची साथ व मार्गदर्शन तसेच ग्रोमिलेट्स महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शाश्वत बाजारपेठेचा उपलब्ध झालेला आधार या उपक्रमामुळे महिलांना उत्पन्नाचे सुरक्षित साधन उपलब्ध झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

समोशासाठी तरुणाला द्यावे लागले घड्याळ, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झाली कारवाई समोशासाठी तरुणाला द्यावे लागले घड्याळ, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झाली कारवाई
मध्य प्रदेशच्या जबलपुर रेल्वे स्टेशन एक धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवाशाला ट्रेनमध्ये समोसे घेणे चांगलेच महाग पडले आहे. त्याला...
Bihar election 2025 – कपडे फाडले, ढसाढसा रडले, जमिनीवर लोळले; तिकीट नाकारले म्हणून RJD नेत्याचा लालूंच्या घराबाहेर धिंगाणा
IND vs AUS – विराट शून्य, रोहित आठ धावांवर बाद; 223 दिवसानंतर कमबॅक, पण अर्ध्या तासात पॅकअप
दिवाळीत काजू, बदाम, मनुके खाताय… सावधान ! एपीएमसीत भेसळ; मसाला मार्केटमध्ये एफडीएचा छापा
मतं दिली नाही म्हणून कुणालाही नमकहराम म्हणणे चुकीचे, मोदींनी गिरीराज सिंह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी! – संजय राऊत
मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्राची जनता गद्दारांच्या ठिकऱ्या उडवल्याशिवाय राहणार नाही! संजय राऊत यांचा मिंध्यांवर घणाघात
चार महिन्यांपासून प्रभारी डॉक्टर नाही, माथेरानच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे झाले खुराडे