31 जिह्यांना फटका… 40 लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे 75 लाख शेतकऱ्यांचे लक्ष

31 जिह्यांना फटका… 40 लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे 75 लाख शेतकऱ्यांचे लक्ष

राज्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या 31 जिह्यातल्या 74 लाख 52 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे  लक्ष लागले आहे. मदतीच्या संदर्भात मंत्रालयात आज मुख्य सचिवांच्या पातळीवर दिवसभर बैठका सुरू होत्या. राज्याच्या तिजोरीत पैसा नसल्याने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कशी मदत करायची यावर खल सुरु होता. पण मदतीच्या आकड्यांबाबत मदतपुनर्वसन, कृषी वित्त विभागाचे अधिकारी अनभिज्ञ होते. उद्याच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करून प्रत्यक्ष नुकसानीचा आकडा स्पष्ट झाल्यावर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल, असे सांगण्यात येत आहे.

 एनडीआरएफचे निकष अपुरे पडणार

मदतीच्या संदर्भात मार्च 2023मध्ये सरकारने जीआर जारी केला होता. एनडीआरएफ एसडीआरएफच्या प्रचलित मदतीच्या दरानुसार कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी  साडे आठ हजार रुपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी 17 हजार रु., बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 22 हजार 500 रुपये दिली जाते. खरडून गेलेल्या पण दुरुस्त होऊ शकणाऱ्या जमिनीसाठी हेक्टरी 18 हजार आणि खरडून गेलेल्या पण दुरुस्त होऊ शकणाऱ्या किमान हेक्टरी पाच हजार आणि कमाल 47 हजार रुपयांची मदत दिली जाते. पण हा मदत एका शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाते. पण आताची अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता मदतीसाठी एनडीआरएफचे निकष अपुरे पडतील असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे.

 सर्वाधिक फटका नांदेड जिह्याला

राज्यातील 36 जिह्यांपैकी 31 जिह्यांमधील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.सर्वाधिक फटका नांदेड जिह्याला बसला आहे. या जिह्यातील 7 लाख 28 हजार 024 हेक्टरवरील पिके पाण्यात वाहून गेली आहेत. त्याखालोखाल अहिल्यानगरमधील 6 लाख 24 हजार 080 हेक्टर, बीडमध्ये 6 लाख हेक्टर, सोलापूर, 4 लाख 8 हजार 368 हेक्टर,  जालना 3 लाख 83 हजार 783 हेक्टर,  यवतमाळ 3 लाख 42 हजार  509 हेक्टर, धाराशीव 3 लाख 31 हजार  935 हेक्टर, वाशिम 2 लाख 5 हजार 812 हेक्टर, छत्रपती संभाजी नगर 1 लाख 68 हजार  300 हेक्टर, बुलडाणा 1 लाख 54 हजार 449 हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत.

एकूण शेतकरी

47 लाख 52 हजार 559

40 लाख 49 हेक्टरवरील  पिके बाधित

तब्बल 31 जिह्यांना फटका

एकूण बाधित जिल्हे 31

एकूण बाधित तालुके197

प्राथमिक अंदाजानुसार बाधित क्षेत्र40 लाख 49 हजार 918 हेक्टर

10 हजार हेक्टरपेक्षा बाधित झालेल्या जिह्यांची संख्या – 17

सर्वाधिक पाऊस कालावधी5ऑगस्ट ते 27 सप्टेंबर 25

सर्वाधिक बाधित झालेली पिके सोयाबीन, मका, कापूसउडीद, तूर, मूग

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“हे खूप वेदनादायक…” अभिनेत्री भूमी पेडणेकरला झाला हा त्वचेचा गंभीर आजार; याची लक्षणे काय? “हे खूप वेदनादायक…” अभिनेत्री भूमी पेडणेकरला झाला हा त्वचेचा गंभीर आजार; याची लक्षणे काय?
बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकार आपल्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेतो. पण कधी कधी काही कारणांमुळे सेलिब्रिटी काही आजांचे बळी होतात. ज्याबद्दल त्यांना...
पुरलेली डेडबॉडी काढून मेकअप करतात! इंडोनेशियातील शेकडो वर्षांची परंपरा
जैसलमेरमध्ये धावत्या खासगी बसला भीषण आग, अनेक प्रवासी होरपळले
तुम्ही मला टार्गेट करा, पण त्या मुलाला एकटं सोडा…, हर्षित राणाला ट्रोल करणाऱ्यांना गौतम गंभीरने सुनावलं
कतार एअरवेजच्या दोहा-हाँगकाँग विमानात तांत्रिक बिघाड, अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग
मोठ्या आवाजात गाणी लावून डॉक्टर्स घालत होते धिंगाणा, पोलीस पोहोचल्यावर झाली अशी अवस्था
जर ओरडलीस तर बलात्कार करायला आणखी लोकांना बोलवू, बंगाल बलात्कार पीडितेना सांगितला भयंकर अनुभव