तामीळनाडूत गोल बुबुळाच्या पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध; ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश

तामीळनाडूत गोल बुबुळाच्या पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध; ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश

तामीळनाडूत पसरलेल्या पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरून गोल बुबुळे असलेल्या पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या संशोधकांना यश आले आहे. या संशोधनामध्ये तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर आणि ईशान अगरवाल यांचा सहभाग आहे. नव्याने शोधलेल्या दोन्ही पालींचा समावेश निमास्पिस कुळात करण्यात आला आहे.

ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून सुरू असलेल्या भारतीय द्विपकल्पामधील पालींच्या सर्व्हेक्षणादरम्यान या पाली प्रथमतः आढळल्या आहेत. गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे वैशिष्टय़ आहे. रंग, आकार, मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील टय़ुबरकलची रचना, जनुकीय संचाच्या वेगळेपणावरून दोन्ही पाली कुळातील इतरांपासून व एकमेकांपासून वेगळय़ा ठरतात.

असे केले नामकरण

‘निमास्पिस व्हॅनगॉगी’ ही प्रजात तामीळनाडूतील श्रीविल्लीपुथूर-मेघमलाई व्याघ्र प्रकल्पामध्ये आढळली. निमास्पिस व्हॅनगॉगी या प्रजातीचे नामकरण प्रसिद्ध चित्रकार वॅन गॉग यांच्या नावावरून केले आहे. या पालीच्या अंगावरील रंगसंगती वॅन गॉग यांच्या ‘द स्टारी नाईट’ चित्राशी मिळतीजुळती आहे.

‘निमास्पिस सथुरागिरीएन्सिस’ ही प्रजात तामीळनाडूच्या विरुदुनगर जिह्यातील साथुरागिरी पर्वतावर आढळून आली. तिच्या आढळक्षेत्रावरुन तिचे नामकरण ‘निमास्पिस सथुरागिरीएन्सिस’ असे केले आहे. नव्याने शोध लागलेल्या दोन्ही पाली दिनचर आहेत. छोटे कीटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

 शिरूरमध्ये आढळराव पाटलांसाठी सुनबाई मैदानात, हडपसर मतदारसंघात नागरिकांशी साधला संवाद शिरूरमध्ये आढळराव पाटलांसाठी सुनबाई मैदानात, हडपसर मतदारसंघात नागरिकांशी साधला संवाद
शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आज त्यांच्या सूनबाई माधुरी अक्षय आढळराव यांनी हडपसर मतदार...
‘शिवा’ मालिकेत अखेर तो क्षण आलाच; प्रपोजलला काय असेल आशुचं उत्तर?
जेंव्हा सावत्र बहीण ईशाच्या लग्नाला नव्हते पोहचले सनी आणि बॉबी देओल, धर्मेंद्र यांनी रागाच्या भरात थेट..
मला सांगताना खूप वाईट वाटतंय..; गौरव मोरेनं जाहीर केला मोठा निर्णय
नवरा मारून टाकेल या भीतीने अभिनेत्री करायची असं काम, पती आहे प्रसिद्ध उद्योजक
मराठीच तुरळक सिनेमे केले अन् आज मराठीचा मुद्दा..; रेणुका शहाणेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे कमेंट्स
श्वेता तिवारी हिचे 2 घटस्फोट, 4 सेलिब्रिटींसोबत प्रेमसंबंध, ऑनसक्रिन जावयासोबत अफेअरच्या चर्चा आणि बरंच काही…