असं झालं तर… विजेचे मीटर काढून नेले तर…
मुंबईसारख्या शहरात विजेचे बिल दोन महिने भरले नाही, तर सोसायटीतील मीटर वीज कंपनीकडून काढून नेला जातो. तुमच्या बाबतीत जर असं काही घडलं तर काय कराल.
सर्वात आधी विजेचे बिल जास्त दिवस थकणार नाही, याची काळजी घ्या. कारण वीज कंपन्या खासगी आहेत. त्या जास्त दिवस थांबत नाहीत.
वीज मीटर काढून नेले तर वीज पुरवठादाराशी संपर्क साधा. त्यांना मीटर काढून नेल्याची माहिती द्या. वीज मीटर कशामुळे काढले हे जाणून घ्या.
ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर काढले असेल तर ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करू शकता. मीटर काढणे हे सुरक्षेचा प्रश्न निर्माण करू शकते. मीटर जोडण्यासाठी अर्ज करा.
मीटर हे कंपनीच्या मालकीचे असतात. त्यामुळे स्वतः मीटर काढण्याचा किंवा नवीन बसवण्याचा प्रयत्न करू नका. मीटर काढूनही बिल आल्यास त्वरित पुरवठादारांशी संपर्क करा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List