झोपेची कमतरता मेंदूसाठी दारुपेक्षाही खतरनाक, तज्ज्ञांचा सल्ला काय ?

झोपेची कमतरता मेंदूसाठी दारुपेक्षाही खतरनाक, तज्ज्ञांचा सल्ला काय ?

अलिकडे झालेल्या संशोधनानूसार झोपेची कमतरता मेंदूवर मद्याच्या प्रभावाप्रमाणे काम करते असे उघड झाले आहे. सातत्याने झोपे कमी मिळाल्याने आपली एकाग्रता नष्ट होत असते. माणसाची स्मृती देखील कमी होते आणि मूडमध्ये लागोपाठ बदल होत राहातो. झोपेच्या कमतरतेचा परिणाम हा अस्थायी नसतो तर कायम स्वरुपी असतो. उदाहरणार्थ मद्य पिल्याने मेंदू अस्थायी रुपाने सुन्न होतो.परंतू अपुऱ्या झोपेचे परीणाम दीर्घकालीन रुपाने शरीरावर निगेटिव्ह इफेक्ट करीत राहतात. लागोपाट कमी झोपणाऱ्या लोकांची हळूहळू मानसिक आणि शारीरिक क्षमता कमी होत जाते.

झोपेचा संपूर्ण मेंदूवर होणारा परिणाम

झोपेच्या कमतरतेचा परिणाम दारु सारखा शरीरावर दिसू लागतो. रात्री नीट झोप न झाल्याने व्यक्तीला सातत्याने थकवा, मानसिक भ्रम आणि आळस येत राहतो.याशिवाय झोप न घेतल्याने मेंदूच्या पेशींचे कार्य देखील प्रभावित होऊ शकते. तज्ज्ञाच्या मते झोप न मिळाल्याने त्याचा परिणाम शरीरावर बराच काळ होत रहातो. झोपेच्या कमतरतेने शरीर आणि मेंदू हळूहळू कमजोर होऊ लागतो. तर मद्याचा परिणाम सर्वसाधारणपणे अस्थायी स्वरुपाचा असतो.

मेंदूला सुरक्षित कसे ठेवाल?

झोपेच्या कमीमुळे अनेक गंभीर त्रास सुरु होतात. त्यांना कमी करण्यासाठी काही उपाय देखील आहेत. तज्ज्ञांच्या मते रात्री ठराविक एकाच वेळेवर झोपणे आणि सकाळी ठराविक एकाच वेळी उठण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे शरीराचे जैविक घड्याळ योग्य होते. रोज किमान ७ तास झोपण्याचा प्रयत्न करा.त्यामुळे शरीर आणि मेंदूला योग्य आराम मिळेल आणि मेंदूच्या पेशी योग्य प्रकारे काम करतील. शरीराला सवय लावण्यासाठी रात्री ९ ते सकाळी ४ पर्यंत झोपण्याची वेळ ठरवा. ही वेळ मेंदू आणि शरीरासाठी योग्य मानली जाते. तज्ज्ञाच्या मते झोपेला प्राथमिकता दिल्याने केवळ थकवा दूर होत नाही तर मेंदू आणि शरीर बराच काळ कार्यरत रहाण्यासाठी हे मदतगार ठरते. चांगली झोप घेणे हे  चांगल्या आरोग्याचे लक्षण मानले जाते. तज्ज्ञ या संदर्भात नेहमीच सल्ला देत असतात की पुरेशी झोप माणसासाठी का गरजेची असते. झोपेच्या अभावी अनेक आजारांना आमंत्रण मिळत असते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;