भांडुपच्या क्रिकेटवेड्याला लागली लॉटरी, जिओ सिनेमाच्या ‘Jeeto Dhan Dhana Dhan’ स्पर्धेत जिंकले 50 लाखांचे सोने

भांडुपच्या क्रिकेटवेड्याला लागली लॉटरी, जिओ सिनेमाच्या ‘Jeeto Dhan Dhana Dhan’ स्पर्धेत जिंकले 50 लाखांचे सोने

TATA IPL 2024 च्या सतराव्या हंगामाला जोरदार सुरूवात झाली. उद्घाटनाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेजंर्स बंगळुरूचा पराभव केला. प्रेक्षकांनी सुद्धा या सामन्याचा भरघोस आनंद घेत आपापल्या संघांना पाठिंबा दिला. विशेष म्हणजे भांडुपच्या अँटोनी जोसेफ डिक्रूझसाठी हा सामना त्याच्या आयुष्याला कलाटनी देणारा ठरला असून त्याने 50 लाख किंमतीचे सोन्याचे बक्षीस जिंकले.

जिओ सिनेमाच्या माद्यमातून आयोजित ‘Jeeto Dhan Dhana Dhan’ स्पर्धेत सहभागी होत अँटोनी डिक्रूझने 50 लाख किंमतीचे सोन्याचे बक्षिस पटकावले. तर उपविजेतेपद गंगटोकचा रहिवाशी असणाऱ्या सुक राज लेपचाने जिंकले. त्याला 10 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे बक्षिस मिळाले. यांच्यासोबत आणखी 50 दर्शकांनी जिओ सिनेमाच्या विनामुल्य स्पर्धेत भाग घेत प्रत्येकी 1 लाख रुपये किंमतीचे सोने जिंकले. तर मेघायलस्थित व्हीलर संगमा हा ‘जीतो धन धना धन’चा पहिला साप्ताहिक विजेता ठरला आहे. त्याला बक्षिसस्वरुपात आकर्षक हॅचबॅक कार मिळाली.

आयपीएल सामन्यांच्या दुसऱ्या दिवशी त्रिपुरातील पवित्र देब बर्माने पहिल्या सामन्यात (DL Vs PBK) मोटारसायकल जिंकली तर त्याच दिवशी झालेल्या दुसऱ्या सामन्यात (SRH Vs KKR) उत्तराखंडचा रहिवासी धीरज घुगत्यालटेक हा दुचाकीचा मानकरी ठरला.

तिसऱ्या दिवशी मध्य प्रदेशचा राजेंद्र कुमार आणि हिमाचल प्रदेशचा सौरभ कुमार यांनी मोटारसायकल पटकावली. पहिल्या सामन्यात (LSG Vs RR) राजेंद्र कुमार तर दुसऱ्या सामन्यात (GT Vs MI) सौरभ कुमार हे विजेते ठरले.

JioCinema वर TATA IPL पाहताना प्रेक्षकांना चांगला अनुभव घेता यावा आणि त्यांचा सहभाव वाढावा हा ‘जीतो धन धना धन’चा मुख्य उद्देश आहे. गेल्या हंगामात सुद्धा प्रेक्षकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावू’; उपमुख्यमंत्री अजित पवार ‘पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावू’; उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या १३ तारखेला होणार आहे. या मतदानाला आता अवघे २ दिवस बाकी असल्याने प्रचाराला...
डॉ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणातील सचिन अंदुरे, शरद कळसकर आहेत तरी कोण?
सोबत या, स्वप्न पूर्ण होतील… मोदी यांची खुली ऑफर; शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय?
PM Narendra Modi Rally : नंदूरबारच्या जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवारांना मोठी ऑफर
अक्षय्य तृतीयेनिमित्त श्री विशाल गणेशाला 5101 आंब्यांचा नैवेद्य
टी20 वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविड प्रशिक्षक पद सोडणार? वाचा जय शहा काय म्हणाले
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण; 11 वर्षांनी निकाल लागला, सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना जन्मठेप