महाराष्ट्रातील ड्रग्ज विक्रीतून लष्कर-ए-तोयबाला मनी सप्लाय; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर गौप्यस्फोट

महाराष्ट्रातील ड्रग्ज विक्रीतून लष्कर-ए-तोयबाला मनी सप्लाय; प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर गौप्यस्फोट

Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात पुणे आणि नाशिक पट्टय़ात अनेक ठिकाणी ड्रग्ज तस्करांचे अड्डे आहेत. तिथून ड्रग्ज सप्लाय केले जाते. त्या ड्रग्जच्या विक्रीतून येणारा पैसा लश्करे तैबा या दहशतवादी संघटनेला पुरवला जात असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. ड्रग्ज तस्करांच्या ठिकाणांची सरकारला माहिती असूनही कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यालयात प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. पुणे-नाशिक पट्टयातील ड्रग्जचे कनेक्शन गोल्डन ट्रँगलशी आहे. म्यानमार, थायलंड आणि लाओसच्या सीमा जिथे एकत्र येतात त्या भागाला गोल्डन ट्रँगल म्हटले जाते. या भागातून जगभरात ड्रग्ज सप्लाय केले जाते.

हिंदुस्थानची पूर्वेकडील सीमा या गोल्डन ट्रँगलपासून जवळ आहे. तिथून ड्रग्ज हिंदुस्थानात आणून महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये पाठवले जातात. या ड्रग्ज विक्रीतून आलेला पैसा लश्करे तैबाला पुरवला जातोय, अशी माहिती एनआयएने दिली असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

कारवाई न करण्यास पेंद्रातील मंत्र्याचा दबाव आहे का?

पोर्ट ब्लेअर बंदरात अठरा हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले गेले होते. मुंब्रा येथे दहा हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते, मात्र त्याची नोंद तपास यंत्रणांकडे नसल्याचा दावाही आंबेडकर यांनी यावेळी केला. राज्यातील व देशातील तरुण पिढी ड्रग्जच्या जाळय़ात अडकत असताना राज्य सरकार कारवाई का करत नाही? कारवाई न करण्यासाठी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पेंद्रातील मंत्र्याचा दबाव आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. फडणवीस यांनी राज्यातील जनतेला याबाबत माहिती दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अर्ध्या वयात नियतीने पत्नीला हिरवलं, पण ‘तो’ आयुष्यभर…. शशी कपूरची अशीही एक प्रेमकथा अर्ध्या वयात नियतीने पत्नीला हिरवलं, पण ‘तो’ आयुष्यभर…. शशी कपूरची अशीही एक प्रेमकथा
मुंबई : जगात क्वचितच अशी एखादी व्यक्ती असेल ज्याने आयुष्यात कधीही प्रेम केले नसेल. प्रेम हे ते वादळ आहे. जे...
उद्धव ठाकरे यांनी ‘पंजा’वर तर राज ठाकरे यांनी ‘धनुष्यबाणावर’ केलं मतदान?
संथ गतीनं मतदानावर उद्धव ठाकरेंचा संताप, पियुष गोयलही भडकले!
देशभरातून महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान, कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान, कुणाला संधी?
मधमाशांचा हल्ला झाला तर हे काम करा, हे चार उपाय फायद्याचे
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात हिंगोली अव्वल! मराठवाड्यात प्रथम तर राज्यात पाचव्या क्रमांकावर
बीड, बारामतीत बोगस मतदान झाले! शरद पवार यांचा स्पष्ट आरोप