हीरामंडीसाठी एक इंटिमेट सीन दिवसभर शूट करावा लागला, अभिनेत्रीने सांगितलं नेमकं काय घडलं

हीरामंडीसाठी एक इंटिमेट सीन दिवसभर शूट करावा लागला, अभिनेत्रीने सांगितलं नेमकं काय घडलं

बॉलीवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची वेब सिरीज ‘हीरामंडी’ 1 मे रोजी रिलीज झाली. या वेब सिरीजमध्ये टीव्ही अभिनेत्री श्रुती शर्मालाही महत्त्वाची भूमिका मिळाली आहे. यामध्ये तिने सायमाची भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिका चाहत्यांना खूप आवडली आहे. या मालिकेत अभिनेत्रीने एक इंटिमेट सीनही केला आहे. या इंटिमेट सीनबद्दल तिने मुलाखतीदरम्यान महिती दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shruti Sharma (@shrutiisharmaa)

एटरटेनमेंट लाइव्हला दिलेल्या मुलाखतीत श्रुतीने इंटिमेट सीनबद्दल भाष्य केलं आहे. ‘एक सीन होता ज्यामध्ये मी आणि इक्बाल होतो आणि तो एक खूप रोमँटिक सीन होता. पडद्यावर असा रोमँटिक सीन मी पहिल्यांदाच केला आहे. आम्ही सीन करत होतो, डायलॉग बोलत होतो. तसेच कोरिओग्राफी करणे देखीलअवघड होते. आम्ही एकमेकांच्या वर होतो. या सीनदरम्यान माझ्या अंगावर पुरळ उठले. मला वाटतं आम्ही हा सीन दिवसभर शूट केला. यावेळी सीन करताना मला काही गोष्टी सहन कराव्या लागल्या, असे ती यावेळी म्हणाली.

हीरामंडी या वेब सिरीजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, शर्मीन सेगल, फरदीन खान, शेखर सुमन, अध्यायन सुमन, संजीदा शेख, फरीदा जलाल या अभिनेत्रींनी काम केले आहे. या वेब सीरिजला चाहत्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे तर काहींना खूप ट्रोल केले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;